मौनी रॉयच्या सोनेरी बॅकलेस ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष, चाहते करताहेत कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. ती नेहमीच तिच्या स्टाईल आणि ड्रेसमुळे चर्चेत असते. चित्रपटांव्यतिरिक्त मौनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती सतत तिचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकते. आता अभिनेत्रीने असा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड अवतारात दिसत आहे. 

अलिकडेच मौनीने (Mouni Roy) तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केेला आहे. हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती सोनेरी रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे. मौनीने इंस्टाग्रामवर सोनेरी ड्रेसमधील तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मौनीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या या फोटोला आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

या फोटोंमध्ये मौनीने सोनेरी रंगाच्या ड्रेसबरोबर तिने केस सरळ करून मोकळे सोडले आहेत. तसेच मेकअप आणि स्टाईल चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. चाहत्यांसह कलाकारही मौनीच्या फोटोवर कमेंट करत आहेत. यासोबतच मौनीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पूलजवळ उभी असलेली दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

 

मौनी रॉयने एकता कपूरची प्रसिद्ध मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर मौनी अनेक मालिकांमध्ये आली पण ‘देवों के देव महादेव’ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर ती ‘नागिन सीझन १’ आणि ‘नागिन सीझन २’ मध्ये दिसली. यानंतर मौनीने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाली. ती ‘रन’, ‘मेड इन चायना’ आणि ‘गोल्ड’मध्ये दिसली होती. ती आता लवकरच आलिया आणि रणबीरसोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. याआधी मौनी रॉय ‘लंडन कॉन्फिडेन्शियल’ या वेब सीरिजमध्येही दिसली आहे.

हेही वाचा :

 

Latest Post