सपनाने चौधरीने साडीमधील फोटो केले शेअर, मात्र लॉन्ग फ्रील स्लीव्ज ब्लाऊजने वेधले सर्वांचे लक्ष

पूर्वी फक्त हरियाणा आणि युपी परिसरातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डान्सर म्हणून ओळख मिळवली सपना चौधरी आता संपूर्ण जगात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे. सपनाने तिच्या डान्सने आणि तिच्या किलर अदांनी सर्वांनाच वेड लावले आहे. सपना बिग बॉसमध्ये आली आणि तिने संपूर्ण जगात ओळख कमावली. आज सपनाचे लाखो चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. सपना तिच्या डान्ससोबतच तिच्या सौंदर्यामुळे देखील ओळखली जाते. सोसहल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी सपना सतत तिच्या पोस्टमुळे प्रकाशझोतात येत असते.

सपनाला फॅशनची अतिशय चांगली समज आहे. ती प्रत्येक ड्रेस अगदी वेस्टर्न वेअरपासून, इंडियन वेयरपर्यंत उत्तम पद्धतीने आणि आत्मविश्वासाने कॅरी करते. सपनाला तिचे फॅन्स इंडियन वेअरमध्ये जास्त पसंत करतात. तिचे साडी, पंजाबी ड्रेसमधील सर्वच लूक तिच्या फॅन्सला खूपच आवडतात. सपनाने नुकतेच तिचे साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सपनाने नारंगी रंगाची प्रिंटेड साडी नेसली असून त्या साडीला गोल्डन रंगाची ब्रॉड बॉर्डर देखील आहे. सपनाने तिच्या या साडीवर हिरव्या रंगाचा लॉन्ग फ्रील स्लीव्ज ब्लाऊज घातला आहे. तिच्या या फोटोनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला ऑन, त्यावर फॅन्सच्या भन्नाट कमेंट्स येत आहेत. या साडीवर तिने हिरव्याच रंगाचा हेव्ही नेकलेस घातला असून, त्यावर छोटे कानातले घातले आहे. त्यावर तिने लाईट मेकअप केला असून, त्यावर तिने छोटी टिकली लावली आहे. जी तिच्या लूक पूर्ण करत आहे. याशिवाय तिने साडीवर बेल्ट देखील लावला आहे, तर केसांचा मेसी हेयर बन घातला आहे.

सपनाने तिचे हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “आज मैं चमक उठी, क्योंकि मैंने साड़ी को गले लगाया था”, काही दिवसांपूर्वीच सपनाने तिच्या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले होते, त्यावर फॅन्सने आणि इंडस्ट्रीमधील काही लोकांनी भरभरून कमेंट्स करत तिच्या लूकचे कौतुक केले होते.

हेही नक्की वाचा-