Saturday, July 26, 2025
Home बॉलीवूड सोनूने चालत्या ट्रेनच्या दरवाजात बनवला व्हिडिओ; रेल्वेने समाचार घेत म्हटले, ‘चाहत्यांपर्यंत चुकीचा…’

सोनूने चालत्या ट्रेनच्या दरवाजात बनवला व्हिडिओ; रेल्वेने समाचार घेत म्हटले, ‘चाहत्यांपर्यंत चुकीचा…’

कोरोना व्हायरसदरम्यान देशभरातील गरजू लोकांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या अभिनेता सोनू सूद याने ‘देवदूत’ अशी ओळख मिळवली. आता कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचे पाहून सोनूने गरज पडली तर तो कायम उभा असेल असे सांगितले होते. तो आजही अनेकांच्या सेवेसाठी उभा राहतो. त्याच्या घराच्या बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र, आता त्याचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे तो टीकेचा धनी ठरला आहे.

झाले असे की, सोनू सूद (Sonu Sood) याने 13 डिसेंबर रोजी ट्विटरवर एक क्लिप पोस्ट केली होती. या क्लिपमध्ये तो चालत्या रेल्वेच्या दरवाजावर बसल्याचे दिसत आहे. रेल्वे चालू लागताच, सोनू दरवाजाच्या बाजूचा हँडल पकडतो आणि चालत्या रेल्वेत हवेचा आनंद लुटताना देताना दिसतो. आता यामुळे नेटकऱ्यांचा पारा चढला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, अभिनेत्याला निष्काळजी म्हणत आहेत. अशातच आता उत्तर रेल्वेनेही प्रतिक्रिया दिली आहे.

नेटकऱ्यांकडून टीका
एका युजरने लिहिले की, “देशभरातील अनेकांचे प्रेरणास्थान असल्याच्या नात्याने तुम्ही असे व्हिडिओ पोस्ट किंवा प्रोत्साहित केले नाही पाहिजे. जर तुमचे चाहते ट्रेनच्या दरवाजावर अशाप्रकारे बसून व्हिडिओ बनवू लागले, तर यामुळे त्यांच्या जीवाला धोका होईल.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सोनू सूद हे खतरनाक आहे.”

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्वीट
इतकेच नाही, तर मुंबई रेल्वे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही यावर भाष्य केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “फूटबोर्डवरील प्रवास सोनू सूद याच्या चित्रपटांमध्ये ‘मनोरंजनाचा’ स्रोत असू शकतो, वास्तविक आयुष्यात नाही! चला तर सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूया. तसेच, सर्वांसाठी ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ची खात्री करूया.”

उत्तर रेल्वेने केले ट्वीट
उत्तर रेल्वेने ट्वीट करत लिहिले की, “प्रिय सोनू सूद, देश आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही एक आदर्श आहात. ट्रेनच्या फूटबोर्डावर बसून प्रवास करणे धोकादायक आहे. अशा व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असे करू नका! सुरळीत आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.”

सोनू सूद याच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘थमिलारासन’ या सिनेमात दिसला होता. त्याच्या आगामी सिनेमांमध्ये ‘मधा गजा राजा’ आणि ‘फतेह’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (actor sonu sood sitting at door of moving train northern railway slams him see video)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आर्थिक तंगीचा सामना करत होती तुनिषा? हजार रुपयांनाही झालेली महाग

जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

हे देखील वाचा