Monday, April 15, 2024

“विकत घेता येत नाही तर…” म्हणत सोनू सूदने सध्या बॉलिवूडमधील ‘त्या’ विशिष्ट कलाकारांवर निशाणा

सध्या ट्विटरवर कलाकारांच्या नावापुढे असलेली ब्लु टिक गायब झाल्यामुळे तुफान गाजत आहे. खास लोकांना त्यांच्या नावापुढे ही ब्लु टिक ट्विटरकडून दिली जाते, जेणेकरून ती त्या व्यक्तीची ट्विटरवरील ओळख असेल. याच ब्लु टिकवरून कलाकार किंवा संबंधित लोकांचे अकाऊंट व्हेरिफाय असल्याचे समजले जाते, अर्थात खरे असल्याचे समजले जाते. बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार ट्विटर या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करतात आणि सर्वांच्या नावापुढे ही विशिष्ट ब्लु टिक आहे. मात्र नुकतीच ही ब्लु टिक ट्विटरने कलाकारांच्या नावापुढून काढून घेतली आहे. यातच अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ब्लु टीकेची मागणी केली आणि त्यांना ती मिळाली देखील. अनेक कलाकारांनी त्यांची ब्लु टिक गेल्यामुळे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

अशातच अभिनेता सोनू सूदने देखील त्याच्या अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे, जे तुफान व्हायरल होत आहे. सोनुने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “भाऊ साहेबांना कोण सांगेल की, या ब्लु टिकला विकत घेता येत नाही तर कमवावे लागते.” सोनूच्या या ट्विटचे तुफान कौतुक होत असून त्याने त्याच्या या ट्विटमध्ये कोणाचे देखील नाव घेतलेले नाही. त्याने इशाऱ्यानेच जे ब्लु टिक पुन्हा नावापुढे येण्यासाठी मागणी करत आहे, त्यांना निशाणा करत हे ट्विट केले आहे.

ट्विटरवरून नावापुढे ब्लु टिक गमावणाऱ्या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा जोनस, रणवीर सिंह, अजय देवगन, अक्षय कुमार, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा आदी अनेक मोठ्या कलाकारांची नावे सामील आहेत. यासोबतच मराठीमधील देखील अनेक कलाकारांच्या नावापुढून ही टिक हटवण्यात आली आहे.

दरम्यान ट्विटरचे सर्वेसर्वा असणाऱ्या एलॉन मस्क यांनी २० एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जाणार असल्याचे सांगितले होते. आता पैसे भरून ही ब्लू टिक घेता येणार आहे. त्यामुळे सर्व अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो

दलाई लामा आणि बाइडन यांच्या मैत्रीवर केलेली ‘ती’ पोस्ट क्वीनच्या अंगाशी, ऑफिसच्या बाहेर निर्दशने पाहून कंगनाने मागितली माफी

हे देखील वाचा