Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

एकदम कडक! पहिल्यांदाच आयोजित केलेल्या पीबीसीएल स्पर्धेत सुबोध भावेचा संघ विजयी, आदिश- सोहमची झक्कास खेळी

पुनीत बालन ग्रूप तर्फे बीपीसीएल ही मराठी कलाकारांसाठी आयोजित केलेली पहिलीवहिली क्रिकेट स्पर्धा होती. यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहून त्यांनी याचा आनंद लुटला. अभिनेता सुबोध भावेचा शिवनेरी लायन्स हा संघ होता. या स्पर्धेत बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील आदिश वैद्य आणि सोहम बांदेकर यांच्या उत्तम खेळीमुळे सुबोधचा शिवनेरी लायन्स हा संघ विजयी झाला. ही स्पर्धा पुण्यात पार पडली. मराठी कलाकारांसाठी अशाप्रकारची स्पर्धा पहिल्यांदा आयोजित केली होती.

बीपीसीएलमध्ये अंतिम सामना पन्हाळा पॅंथर आणि शिवनेरी लायन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात पन्हाळा पॅंथरने प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी ७६ धावा केल्या होत्या. ७६ धावांचे आव्हान देताना शिवनेरी लायन्सने ८ गडी गमावले होते. यावेळी शिवनेरी लायन्सकडून खेळताना शिखर ठाकूरने सर्वाधिक शिखर ठाकूरने सर्वाधिक १४ धावांची खेळी केली, तर आदिश वैद्यने ११ आणि कुणाल फडकेने १० धावांचे योगदान दिले.

या धावांचा पाठलाग करताना शिवनेरी लायन्स संघाकडून सोहम बांदेकरने नाबाद २० धावा कुटल्या, तर दीपक नायुडूने १८ धावा आपल्या नावावर केल्या. अशाप्रकारे शिवनेरी लायन्सने ६ गडी राखून विजय मिळवला.

या विजयानंतर सुबोध भावेने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये विजयाचा आनंद व्यक्त करत लिहिले की, “पुण्यात पार पडलेल्या #PBCL (season 1) या पहिल्या कलाकारांच्या क्रिकेट स्पर्धेत आमचा संघ ‘शिवनेरी लायन्स’ विजेता ठरला. माझ्या पूर्ण संघाची एकदम कडक मेहेनत आणि प्रत्येकानी केलेल्या उत्तम कामगिरीमुळें हे शक्य झालं. अतिशय उत्तम पद्धत्तीने ही स्पर्धा पार पडली. संयोजकांचे आभार आणि माझ्या संघावर प्रचंड प्रेम.”

या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मनोरंजन करतानाच अशा स्पर्धांचे आयोजन कलाकारांना रिफ्रेश करते. या स्पर्धेत महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव हे वेगवेगळ्या संघांचे कर्णधार होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा