महाराष्ट्राच्या सौम्या कांबळेच्या डोक्यावर सजला ‘इंडियास बेस्ट डान्सर’च्या दुसऱ्या पर्वाचा ताज, आलिशान गाडीसोबत मिळाले १५ लाख

सोनी वाहिनीवरील लोकप्रिय डान्स कार्यक्रम ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या दुस-या पर्वाला त्यांचा पुढचा सर्वोत्तम डान्सर मिळाला आहे. यावेळी इंडियाज बेस्ट डान्सर पर्व २ च्या विजेतेपदाचा मुकुट पुण्याच्या सौम्या कांबळेने पटकावला आहे.
तत्पूर्वी इंडियाज बेस्ट डान्सर पर्व २ मध्ये गौरव सरवन, सौम्या कांबळे, जमरूद, रोजा राणा, रक्तिम ठाकुरिया यांची ५ अंतिम स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली होती, ज्यामधून सौम्या कांबळेला विजयी घोषित करण्यात आले, तसेच तिचे नृत्यदिग्दर्शक वर्तिका झा यांनाही सन्मानित केले गेले.

आलिशान कार आणि सोबत मिळाले १५ लाख रूपये

‘इंडियाज बेस्ट डान्सर पर्व २’ ची विजेती महाराष्ट्राची नृत्यांगणा सौम्या कांबळेला बेस्ट डान्सरच्या सन्मान चिन्हासोबत बक्षिस म्हणून सोनी वाहिनीकडून १५ लाख रुपयांचा चेक आणि एक चमचमणारी आलिशान कार सुद्धा देण्यात आली आहे. परंतू ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ ची विजेती सौम्या कांबळे प्रकृती अत्यावस्थेमूळे अंतिम फेरीत सहभागी होऊ शकली नाही, तसेच तिची नृत्यदिग्दर्शिका वर्तिकानेही कोणतही सादरीकरण केले नव्हते. (indias best dancer season 2 soumya kamble become best ka next avatar won a car and 15 lakh)

View this post on Instagram

A post shared by Indias Best Dancer's 2 (@indiasbestdancers2official)

नृत्यदिग्दर्शिका वर्तिका झा ला मिळाला ५ लाखाचा चेक 

‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ ची विजेती सौम्या कांबळेचे नृत्यदिग्दर्शन वर्तिका झाने केले होते. त्यामूळे तिच्या विजयात वर्तिकाचा ही मोलाचा वाटा होता. म्हणूनच सोनी वाहिनीकडून तिलाही ५लाख रूपयेचा चेक देऊन सन्मानित केले गेले.

दरम्यान, अंतिम स्पर्धकांमध्ये जयपूरच्या गौरव सरवनला प्रथम क्रमांक तर ओडीसाच्या रोजा राणाला द्वितीय क्रमांक देण्यात आला. सोबतच रक्तिम ठाकुरिया आणि जमरूधला अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक देण्यात आला. अंतिम फेरीतील या चारही स्पर्धकांना १ लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे.

या स्पर्धेची मुख्य विजेती सौम्या कांबळेला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ‘’हमारी छोटी हेलेन’’चा किताब दिला आहे. सौम्याने आशा भोसले आणि चाहत्यांसोबतच सगळ्या परीक्षकांची ही मने जिंकली आहेत, सगळे परीक्षक तिच तोंडभरून कौतुक करत आहेत.

हेही वाचा :

 

Latest Post