‘गदर’ चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार बाथरूममध्येच सोडून गेला होता सनी देओल; कारण वाचून व्हाल हैराण


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना त्यांच्या रागासाठी ओळखले जाते. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे सनी देओल होय. असे म्हटले जाते की, जेव्हा त्याला राग येतो, तेव्हा तो कोणाचेच ऐकत नाही. सनीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘गदर’, ‘घायल’, ‘त्रिदेव’ यांसह इतर अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सनीला चित्रपट कारकिर्दीत एक ऍक्शन अभिनेता म्हणूनही ओळखले जाते. त्याने ‘गदर’ चित्रपटात पाकिस्तानमधील हँडपंप उखडला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अमीषा पटेलने काम केले होते. हा चित्रपट चाहत्यांना भलताच आवडला होता. मात्र, या चित्रपटासाठी एक पुरस्कार घेण्यासाठी पोहोचलेल्या सनीने असे काही केले होते, ज्याने सर्वांनाच हैराण केले होते.

खरं तर सनीला ‘गदर’ चित्रपटासाठी ‘बेस्ट क्रिटिक्स ऍक्टर चॉईस अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, सनीला हा पुरस्कार आवडला नव्हता आणि तो पुरस्कार बाथरूममध्येच सोडून निघून गेला होता. तसे पाहिले, तर सनीसह बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे पुरस्कार मिळण्यात बिल्कुल विश्वास ठेवत नाहीत. तसेच ते पुरस्कार सोहळ्यात देखील सहभाग घेत नाहीत. सनीप्रमाणे त्याचे वडील आणि एव्हरग्रीन अभिनेते धर्मेंद्रलाही पुरस्कार आवडत नाहीत. या दोघांनीही चित्रपट कारकिर्दीत दिले जाणाऱ्या पुरस्कारांबाबत अनेक वक्तव्य केले आहे आणि पुरस्कार दिल्या जाण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की, बाथरूममध्ये पुरस्कार सोडण्याचे सनीचे नेमके कारण काय होते. (Actor Sunny Deol Received Best Critic Actor Award For The Film Gadar He Left It In The Bathroom Know Reason Why)

या कारणामुळे सोडला होता पुरस्कार
झी टेलिफिल्म्सचे माजी सीईओ संदीप गोयल यांनी आपल्या पुस्तकात ‘ऑनेस्ट टू गॉड’मध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की, नेमकं सनीने आपला पुरस्कार बाथरूममध्ये का सोडला होता. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाची निर्मिती झी टेलिफिल्म्सने केली होती. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजनही झीनेच केले होते. तरीही जेव्हा चित्रपटांमध्ये पुरस्कार देण्याची वेळ आली, तेव्हा यादीत आमिर खानच्या चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, सनी देओलचा ‘गदर’ हा चित्रपट या यादीतून बाहेर होता.

या कारणामुळे ‘गदर’ चित्रपटाला पुरस्कारांच्या यादीत केले नव्हते सामील
खरं तर झीनेच सनी देओलच्या ‘गदर’ चित्रपटाची निर्मिती केल्यामुळे या चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यात सामील केले नव्हते. या पुरस्कार सोहळ्यात आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला ‘बेस्ट फिल्म अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आणि यासोबतच आमिरला ‘बेस्ट ऍक्टर’चा पुरस्कारही मिळाला. सनीही या पुरस्कार सोहळ्यात सामील झाला होता. त्याच्या समोरून हा पुरस्कार आमिर घेऊन जात होता.

काही लोकांनी सनीला भडकवले होते
झी टेलिफिल्म्सचे माजी सीईओ संदीप गोयल यांनी आपल्या पुस्तकात हेही सांगितले की, सनी देओल जेव्हा या पुरस्कार सोहळ्यात सामील झाला, तेव्हा त्याला अनेकांनी भडकवले की, त्याला या पुरस्कार सोहळ्यात अपमानित करण्यासाठी बोलावण्यात आले होते. संदीप यांनी सांगितले की, “या पुरस्कार सोहळ्यात सनीसाठी एक विशेष पुरस्कार ठेवण्यात आला होता. त्याचा हा पुरस्कार ‘बेस्ट क्रिटिक्स ऍक्टर चॉईस अवॉर्ड’ होता. हा पुरस्कार घेण्यासाठी सनी मंचावरही आला होता. मात्र, पुरस्कार घेतल्यानंतर तो काहीच न बोलता तिथून निघून गेला.”

बाथरूममध्ये सोडला होता पुरस्कार
संदीप यांनी आपल्या पुस्तकात पुढे लिहिले की, त्यांना शोनंतर असे समजले की, सनी आपला पुरस्कार बाथरूममध्येच विसरून गेला होता. हे ऐकून त्यांना खूप दु:ख झाले की, सनीने असे केले. त्यांनी म्हटले की, यानंतर त्यांची आणि सनीची कधीच भेट झाली नाही.

Photo Courtesy: Instagram/

संदीप यांच्या पुस्तकानुसार, सनीच्या मनात तेव्हापासूनच पुरस्कार सोहळा आणि पुरस्कार देण्याच्या या प्रक्रियेचा द्वेष निर्माण झाला. यामुळेच तो आता कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात सामील होत नाही. तसे तर सनीसोबत आमिर खान आणि कंगना रणौतसारखे अनेक कलाकार आजही पुरस्कार मिळण्यात विश्वास ठेवत नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इतिहासातील सोनेरी पान : बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीझ

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक


Leave A Reply

Your email address will not be published.