Monday, July 1, 2024

कोणत्याही आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही सनी देओलचा बंगला; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच ना!’

रफ एँड टफ स्टाईलसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे सनी देओल. सनीच्या रागीट लूकमुळे अनेक चाहत्यांचा आवडता हिरो आहे. मग तो ‘दामिनी’ असो किंवा ‘गदर: एक प्रेम कथा’ या प्रत्येक भूमिकेत तो लोकप्रिय झाला आहे. सनी मुंबईतील मलबार हिल्समधील एका आलिशान बंगल्यात राहतो. त्याचा बंगला कोणत्याही आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही.

लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक सनी देओल आजकाल चित्रपटांमध्ये नव्हे, तर राजकारणात सक्रिय असतो. पंजाबमधील गुरुदासपूर येथील खासदार सनी मुंबई आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी राहतो. सनीचा पंजाबमध्येही एका आलिशान बंगला आहे, पण मुंबईच्या घरात सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

https://www.instagram.com/p/B5kQqVfp4Rb/?utm_source=ig_web_copy_link

सनी देओलचा बंगला रंगीबेरंगी काचेने सजवलेला आहे, ज्यावर सूर्याची किरणं पडल्यावर इंद्रधनुष्यासारखी चमकतात. तसेच सप्तरंगांनी फुललेला ही बंगला प्रचंड सुंदर दिसतो. सनी देओलचा बंगला अगदी हटके आणि स्टायलिश आहे. त्याच्या बंगल्यासमोर एक सुंदर बागेचा परिसर आहे. जिथे कलाकार सकाळी आणि संध्याकाळी आनंद घेताना दिसतात.

त्या बागेत विविध प्रकारची फुले आहेत. मोठमोठ्या झाडामुळे अनेक पक्षी तिथे येतात. तसेच बसण्यासाठी अप्रतिम जागा आहे. सनीचा बंगला इतका मोठा आहे की, 40 हून अधिक लोक या बंगल्यात आरामात राहू शकतात. आता मलबार हिल्ससारख्या सुंदर भागात सनीचा एक एवढा मोठा बंगला आहे, याचा अंदाजही तुम्ही लावू शकता.

सनीच्या आलिशान बंगल्यात स्विमिंग पूलही आहे. तसेच एक व्यायामशाळा आहे. ज्यात सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा आहेत. येथे सनी अनेकदा आपल्या मुलांबरोबर फिटनेस तसेच मजाही करताना दिसतो. सनी त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेतो. म्हणूनच तो त्यांच्या बंगल्यात बांधलेल्या जिममध्ये वेळ घालवताना दिसतो.

सनीच्या आलिशान बंगल्यात चित्रपटगृह देखील आहे. जिथे एकाच वेळी बरेच लोक एकत्र बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेत मजा मस्ती करु शकतात. दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा सनीचा बंगला प्रचंड सुंदर सजवलेला आहे. त्यांच्या बंगल्याच्या छतावर हेलिपॅडची सुविधाही उपलब्ध आहे. सनी त्याची आई प्रकाश कौर, पत्नी पूजा आणि दोन्ही मुले करण- राजवीर यांच्यासोबत मुंबईत राहतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही नक्की वाचा-
‘हम बच्चे ही रहेंगे’, म्हणत आई प्रकाश कौरसोबत बर्फात खेळताना दिसला सनी देओल
सनी देओलच्या ‘या’ दमदार संवादांवर आजही वाजवल्या जातात जोरदार शिट्ट्या

हे देखील वाचा