Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावेचा हळदीचा समारंभ दणक्यात संपन्न, फोटो व्हिडिओ व्हायरल

मधल्या काही काळात कोरोनामुळे लग्नसराईला ब्रेक लागला होता. मात्र, आता कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता पुन्हा मनोरंजन विश्वात लग्नांना सुरुवात झाली आहे. यावर्षातील लग्नाच्या सिझनला सुरुवात झाली असून या सीझनचा श्रीगणेशा मराठी अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांच्या लग्नाने होत आहे. काही दिवसांपूर्वीच सुयश टिळकने आयुषीसोबत साखरपुडा करत त्याच्या फॅन्सला आणि प्रेक्षकांना सुखद धक्का दिला होता. काही दिवसांपासूनच या दोघांच्या केळवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्या फोटोंवरून प्रेक्षक हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावत होते.

प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला आहे. सुयश आणि आरुषी लग्नबंधनात अडकले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मेहेंदीचे, हळदीचे आणि संगीत कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुयश टिळक हा मराठमोळा अभिनेता मराठी मालिकांमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा आहे, तर आयुषी भावे एक अप्रतिम डान्सर असून, आयुषीने झी युवा डान्सिग क्वीन या शोमधून घराघरात ओळख मिळवली.

नुकतेच या दोघांचे हळदीचे फंक्शन संपन्न झाले. या कार्यक्रमात सुयश आणि आयुषीसोबत त्यांच्या नातेवाईकांनी देखील धमाल केली. त्यांच्या मजामस्तीचे व्हिडिओ आणि फोटो खूपच गाजत आहे. यावेळी सुयशने पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला होता तर आयुषीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. हळदीने माखलेल्या या जोडप्याचा इथे देखील भरपूर रोमान्स सुरु दिसला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या हातावर सुयशच्या नावाची मेहंदी चढली आहे. शिवाय संगीताच्या कार्यक्रमात या दोघांनी केलेला रोमँटिक डान्स देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लवकरच आयुषीचा आगामी सिनेमा येणार आहे. सुयशने त्याच्या साखरपुड्याची घोषणा करताना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. हॅप्पी बर्थ डे लव…. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालोय. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने व प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय. ज्यांनी आमचा हा क्षण अतिशय खास बनवला त्या सगळ्या मित्रपरिवाराचे आणि कुटुंबियांचे मनापासून आभार.”

हे दोघे २१ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-‘हाय प्रोफाइल असण्याची किंमत मोजावी लागते’, म्हणत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आर्यनची चिंता

-‘या’ कारणामुळे शाहरुखने आपल्या लाडक्याचे नाव ठेवले होते ‘आर्यन’, मुलीशी आहे कनेक्शन

हे देखील वाचा