ज्या दिवसाची मागील अनेक महिन्यांपासून फॅन्स वाट बघत होते तो दिवस अखेर आज उजाडला आहे. अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे आज २१ ऑक्टोबर रोजी लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या साखरपुड्याची घोषणा झाल्यानंतर फॅन्सला त्यांच्या लग्नाची खूपच उत्सुकता होती. आज या दोघांनी सप्तपदी चालत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वाचन घेतले. जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.
मराठी चित्रपट खासकरून मालिकांमधील सर्वात लाडका आणि प्रसिद्ध अभिनेता अशी ओळख असणाऱ्या सुयशने खूपच कमी काळात स्वतःचे मोठे प्रस्थ निर्माण केले. सर्वांच्याचा विशेषतः मुलींच्या गळ्यातील ताईत झालेल्या सुयशने डान्सर आणि अभिनेत्री असलेल्या आयुषी भावेसोबत लग्न केले आहे. रिऍलिटी टीव्ही शो मराठी डान्सिंग क्वीन मधून नावारूपास आलेल्या आयुषीने तिच्या नृत्याने सर्वांनाच मोहून टाकले.
अतिशय पारंपरिक आणि मराठमोळ्या पद्धतीने सुयश आणि आयुषीचा विवाह झाला. यावेळी आयुषीने लाल रंगाची नऊवारी साडी, तर सुयशने मोती रंगाचा कुर्ता आणि लाल रंगचे धोतर असा पेहराव केला होता. सुयशची टोपी आणि पंचा त्याचा लूक अधिकच आकर्षक करत होते. दोघेही त्यांच्या लूकमध्ये कमाल दिसत आहेत. त्यांचे लग्न संपूर्ण विधीवत पद्धतीने पार पडले. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या दोघांच्या लग्नआधी झालेल्या सर्व विधी आणि सोहळ्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर नुसते व्हायरलनाही झाले तर ट्रेंडिंगमध्ये आले आहे. सोशल मीडियावर कलाकारांसोबतच त्यांच्या फॅन्सकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. आयुषीच्या वाढदिवसाच्या दिवशी सुयशने त्याने ७ जुलै रोजी साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले होते. इंस्टाग्राम पोस्टमधून आयुषीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’
-‘हाय प्रोफाइल असण्याची किंमत मोजावी लागते’, म्हणत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आर्यनची चिंता
-‘या’ कारणामुळे शाहरुखने आपल्या लाडक्याचे नाव ठेवले होते ‘आर्यन’, मुलीशी आहे कनेक्शन