Friday, April 4, 2025
Home मराठी मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक अभिनेता अडकला लग्न बंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक अभिनेता अडकला लग्न बंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

लगीन सराई सुरू झाल्यापासून चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. मराठी तसेच हिंदी चित्रपटातील अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक अभिनेता लग्न बंधनात अडकला आहे. तो अभिनेता म्हणजे सुयोग गोऱ्हे. सुयोगने नेहा शिंदेसोबत नाशिकमध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुयोगने (suyog ghore) त्याच्या लग्नाबाबत गुप्तता ठेवली होती. आता लग्न झाल्यावर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, नव वर-वधू दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. नेहाने नऊवारी साडी नेसली आहे, तर सुयोगने शेरवानी घातली आहे. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चाललेच व्हायरल होत आहेत. त्यांचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून त्यांना त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. (actor suyog gohre’s wedding photo’s viral on social media)

सुयोगचे मूळ गाव नाशिक आहे. तो अभिनेता असण्यासोबतच एक होमिओपॅथी फिजिशिअन आहे. कॉलेजमध्ये असताना सिद्धार्थ चांदेकरच्या एका चित्रपटासाठी त्याने स्पॉटबॉय म्हणून काम केले होते. त्यानंतर २०१७ साली त्याने ‘बसस्टॉप’ या चित्रपाटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता खानविलकर, पूजा सावंत, सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे कलाकार होते.

याशिवाय त्याने ‘शेंटिमेंटल’, ‘अनान’, ‘कृतांत’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘गर्लफ्रेंड’, ‘साताऱ्याचा सलमान’ आणि ‘सिनिअर सिटीझन’ या चित्रपटात काम केले आहे. यानंतर तो नावारूपाला आला. त्याचे लग्न झाल्याची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

हेही वाचा :

काय सांगता! ‘तारक मेहता’ची दयाबेन अर्थात दिशा वाकानी आहे प्रेग्नंट? व्हायरल होणारे फोटो तर हेच सांगत आहे

सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरण, जॅकलिन फर्नांडिसची कोट्यवधींची संपत्ती ईडी करणार जप्त?

लगीनघाई! रिचा चड्ढा अन् अली फजल आपल्या नात्याला देणार नवीन नाव, ‘या’ वर्षी घेणार सात फेरे? 

 

हे देखील वाचा