लगीनघाई! रिचा चड्ढा अन् अली फजल आपल्या नात्याला देणार नवीन नाव, ‘या’ वर्षी घेणार सात फेरे?


रिचा चड्ढा आणि अली फजल हे बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. २०२० पासून त्यांनी त्यांच्या मैत्रीला वेगळे नाव देण्यास तयार आहेत. परंतु त्यांनी कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. लॉकडाऊनच्या वेळी त्या दोघांनी लपून लग्न केले आहे, अशी अफवा पसरली होती. मात्र, अलीने हे स्पष्ट केले की, अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही. २०२१ च्या अखेरीस या दोघांच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रिचा आणि अली अखेर २०२२ मध्ये त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अली फजल हा रिचा चड्ढाशी लग्नगाठ बांधणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पुढच्या वर्षी मार्चमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. ‘फुकरे’ चित्रपटातील ही जोडी लग्न करण्यास तयार असून सध्या लग्न कुठे करायचे याचा विचार करत आहेत. त्यांचे लग्न मुंबई किंवा दिल्ली मध्ये होऊ शकते.

कोरोनामुळे अली फजल आणि रिया चड्ढा यांच्या लग्नांमध्ये त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. त्यामुळेच हे जोडपे त्यांच्या लग्नासाठी वेगवेगळे ठिकाण शोधत आहे. त्यांना लग्नामध्ये कोरोना किंवा वेगळ्या प्रकारचे व्यत्यय नको म्हणून त्यांनी लग्नासाठी मार्च महिना निवडला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रिचाने एका मुलाखतीमध्ये असे म्हटले होते की, लग्न म्हणजे एक जबाबदारी असते. “आम्हाला असे वाटते की, लग्नामध्ये सहभागी होणारे मित्रपरिवार आणि कुटुंब त्याचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे लग्नात सहभागी होणारे लोक आमची जबाबदारी आहेत. आम्हाला हे लग्न सुपर स्प्रेडर इव्हेंट नाही बनवायचा.” ती असे देखील म्हणते की, पुढच्या वर्षी सर्व कोरोनाचे वातावरण ठीक होईल, तेव्हा आम्ही लग्नबंधनात बांधले जाणार आहोत.”

रिचा आणि अलीने ‘फुकरे’ तसेच ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!