Tuesday, November 18, 2025
Home मराठी आपल्या मुलीचा व्हिडिओ शेअर करताना स्वप्नील जोशी झाला भावुक, म्हणाला…

आपल्या मुलीचा व्हिडिओ शेअर करताना स्वप्नील जोशी झाला भावुक, म्हणाला…

मनोरंजनविश्वातील कलाकार हे नेहमीच त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर बोलताना वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करणे अजिबात विसरत नाही. अनेकदा कलाकार त्यांच्या कुटुंबाबद्दल देखील काही फोटो शार करत पोस्ट करतात. आपल्या मुलांबद्दल प्रत्येक जणं खूपच भावुक असतो. मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. त्यातही वडिलांसाठी मुलगी नेहमीच आधी येते आणि सर्वात जावळी असते. वडील आणि मुलीचे नाते खूपच वेगळे आणि शब्दात न मांडता येण्यासारखे असते. मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम आणि रोमँटिक अभिनेता अशी ओळख मिळवलेल्या स्वप्नील जोशीने देखील त्याच्या मुलींसाठी एक खुच सुंदर आणि कमी शब्दात जास्त व्यक्त होणारी पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्नील जोशी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या विविध पोस्ट शेअर करत फॅन्सच्या सतत संपर्कात असतो. नुकताच त्याने त्याची मुलगी असलेल्या मायराचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या रील व्हिडिओडमध्ये मायराने इरकलची साडी नेसत आणि त्यावर पारंपरिक दागिने परिधान करत मस्त पोज दिली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत स्वप्नीलने कॅप्शनमध्ये लिहिले, “अचानक मोठी झाली यार.” त्याच्या या चार शब्दात त्याच्या मनातील भावना आणि इमोशन पूर्णपणे स्पष्ट होत आहे.

स्वप्निलच्या या पोस्टवर अभिनेत्री शिल्पा तुळसकर, संजय जाधव, मंजिरी ओक, प्रसाद ओक आदी अनेक कलाकारांनी कमेंट्स करत मायराचे कौतुक केले आहे. स्वप्नील नेहमीच त्याच्या मुलांसोबतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. स्वप्नीलने त्याच्या मुलांना खूपच सामान्य मुलांप्रमाणे मोठे केले असून, त्यांना त्याने उत्तम संस्कार दिले आहे. त्यामुळेच नेहमीच स्वप्निलच्या मायरा आणि राघव या दोन्ही मुलांचे सोशल मीडियावर खूपच कौतुक होत असते.

दरम्यान स्वप्नील जोशी सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत झळकत असून, चला हवा येऊ द्या मध्ये देखील तो दिसत असतो. लवकरच तो परेश मोकाशी यांच्या ‘वाळवी’ या सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न

‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल

हे देखील वाचा