Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

दिशा आणि टायगरचे नाते तुटले? अभिनेत्याच्या जवळच्या मित्रानेच सांगितले ब्रेकअपबद्दल खरं काय ते

बॉलिवूडमध्ये दररोज नवीन नाती बनतात आणि तुटतात. काही नाती अशी असतात, जी तुटल्यानंतरही एवढं काही वाईट वाटत नाही. मात्र, काही नात्यांवर चाहत्यांचा एवढा जीव जडलेला असतो की, त्यांच्या नात्याला खिंडार पडली की, यांचा जीव खाली-वर झाल्याशिवाय राहत नाही. अशीच परिस्थिती निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्याविषयी ही बातमी आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, दिशा पटानी (Disha Patani) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांनी त्यांचे ६ वर्षांच्या नात्यावर पूर्णविराम लावला आहे. याचा अर्थ असा की, ते दोघे जोडपे म्हणून एकत्र नाहीयेत. मात्र, चाहत्यांकडून असा प्रश्न उपस्थित होत आहे की, असे काय झाले, ज्यामुळे दिशा आणि टायगरने त्यांच्या वेगळ्या वाटा निवडण्याचा निर्णय घेतला?

दिशा आणि टायगर श्रॉफ नाहीत सोबत
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ (Disha Patani And Tiger Shroff Breakup) बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांना नेहमीच एकत्र स्पॉट केले जाते. कदाचित आता हे दोघेही जोडपे म्हणून एकत्र दिसणार नाहीत. माध्यमांतील वृत्तानुसार, दिशा आणि टायगरच्या नात्यात मागील एका वर्षापासून खूप चढ-उतार येत होते. मात्र, कधीही त्यांनी ही गोष्ट जगजाहीर होऊ दिली नाही.

दिशा आणि टायगर यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला, याचे खरे कारण अद्याप समोर आले नाहीये. मात्र, इतके नक्की आहे की, हे दोघेही आता सिंगल आयुष्य जगत आहेत. माध्यमांशी संवाद साधताना टायगरच्या एका मित्राने जोडप्याच्या ब्रेकअपच्या बातम्या खऱ्या असल्याचे सांगितले. टायगरचा मित्र सांगतो की, ब्रेकअपमुळे टायगरच्या कामावर कोणताही परिणाम येणार नाही. तो आधीसारखाच त्याच्या कामावर लक्ष देत आहे. तो सध्या लंडनमध्ये असून त्याच्या सिनेमाची शूटिंग करत आहे. हे दोन्ही कलाकार एकत्र नसले, तरीही त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम आहे. आता हे दोघेही त्यांच्या ब्रेकअपवर काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘या’ सिनेमात झळकतील दिशा आणि टायगर
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर दिशा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ सिनेमात झळकणार आहे. तसेच, टायगर ‘गणपत’ आणि ‘बागी ४’ या दोन सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
विषयच खोल! ‘हा’ भोजपुरी स्टार वडिलांच्या परवानगीशिवाय घेत नाही अभिनेत्रीची किस, निर्मात्यांना थेट सांगतो…
कारगिल युद्धावर आधारित ‘हे’ ५ सिनेमे पाहिलेत का? पाहून तुमचीही छाती गर्वाने फुगेल
श्रेयस तळपदेला लागली लॉटरी! कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये बनला माजी पंतप्रधान, फर्स्ट लूक वेधतोय लक्ष

हे देखील वाचा