Tuesday, May 21, 2024

कारगिल युद्धावर आधारित ‘हे’ ५ सिनेमे पाहिलेत का? पाहून तुमचीही छाती गर्वाने फुगेल

मंगळवारी (दि. २६ जुलै) संपूर्ण भारतात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. कारगिल दिवस हा प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारा आहे. कारण, २६ जुलै, १९९९ रोजी भारताने पाकिस्तानला कारगिल युद्धामध्ये चारी मुंड्या चीत केले होते. या विजयाला आता २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही त्या आठवणी भारतीयांच्या मनात कायम आहेत. या खास दिवसाच्या निमित्ताने आपण कारगिल युद्ध आणि त्यातील जवानांवर बनलेल्या बॉलिवूड सिनेमांबद्दल जाणून घेऊया. या सिनेमांमधूनच देशाच्या खऱ्या खुऱ्या हिरोंच्या धैर्याला सलाम ठोकण्यात आला.

एलओसी: कारगिल
जेपी दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘एलओसी: कारगिल‘ हा सिनेमा कारगिल युद्धावर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात संजय दत्त, अजय देवगण, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, संजय कपूर, मनोज वाजपेयी आणि अक्षय खन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते.

शेरशाह
सन २०२१मध्ये कारगिल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आधारित सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने विक्रम बत्रांची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन विष्णूवर्धन यांनी केले होते.

लक्ष्य
‘लक्ष्य’ हा सिनेमा सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर याच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. या सिनेमाची कहाणीही एका अशा मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे, जो सैन्यात भरती होतो आणि कारगिल युद्ध लढणाऱ्या सैनिकांपैकी एक असतो. या सिनेमातील मुख्य भूमिका ऋतिक रोशन याने साकारली होती.

गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल
शरण शर्मा दिग्दर्शित ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा सिनेमाही कारगिल युद्धावर आधारित आहे. २०२०मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात देशाची पहिली महिला पायलट असणाऱ्या गुंजन सक्सेना यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेत्री जान्हवी कपूर हिने गुंजन सक्सेना यांची भूमिका साकारली आहे.

धूप
सन २००३मध्ये प्रदर्शित झालेला ‘धूप’ हा सिनेमा कॅप्टन अनुज नय्यर यांच्या कुटुंबावर आधारित आहे. त्यांनी देशासाठी कारगिल युद्धाचे नेतृत्व केले होते. या सिनेमात अभिनेते ओम पुरी झळकले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
श्रेयस तळपदेला लागली लॉटरी! कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये बनला माजी पंतप्रधान, फर्स्ट लूक वेधतोय लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्याचं मोडलं हाड, हॉस्पिटलमधून शेअर केला वाईट अवस्थेतील फोटो
तब्बल आठ वर्षांनी ‘चला हवा येऊ द्या’ टीमसाठी मिळाली आनंदाची बातमी, श्रेया बुगडेने केला खुलासा

हे देखील वाचा