‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा टायगर श्रॉफ याला आज सगळं जग ओळखतं. टायगर त्याच्या जबरदस्त ऍक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो आणि त्याचे ऍक्शन सीन्सही प्रेक्षकांना आवडतात. सोशल मीडियावर लाखो लोक या अभिनेत्याला फॉलो करतात.
टायगर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो नियमित त्याचे अपडेट्स त्याच्या चाहत्यांना देत असतो. अशात टायगरचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. मात्र या व्हिडिओमुळे अभिनेत्याचे चाहते फारच अस्वस्थ झाले आहेत.
टायगर श्राॅफ (Tiger Shroff) याने 3 ऑक्टाेबर 2022ला त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाेस्ट केला. व्हिडिओसाेबत अभिनेत्याने कॅप्शन लिहिले की, “एक्शन हिरोच्या आयुष्यातील आणखी एक दिवस” व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेता पायजमा घालून सोफ्यावर बसला आहे आणि डॉक्टर त्याच ब्लड प्रेशर मोजत आहेत. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते खूपच अस्वस्थ झाले आहेत. व्हिडिओवर चाहते कमेंटच्या माध्यमातून काळजी व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
मार्क रिनो स्मिथने टायगर श्रॉफच्या व्हिडिओवर कमेंट करत त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. तर आणखी एका युजरने लिहिले की, “मेहनती माणूस.” दुसर्या चाहत्याने लिहिले की, “तुमची तब्येत नेहमीच चांगली राहाे”.
क्रिती सेननसोबत ऍक्शन करताना दिसणार टायगर
‘हिरोपंती’ चित्रपटामधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा टायगर शेवटचा ‘हिरोपंती 2’ मध्ये दिसला होता. यंदाच्या ख्रिसमसला अभिनेता ‘गणपत पार्ट 1’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनन दिसणार आहे. दोघेही चित्रपटात जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहेत. याशिवाय टायगर श्रॉफ सिद्धार्थ आनंदच्या प्रोडक्शमध्ये बनलेला ‘रॅम्बो’ चित्रपटातही दिसणार आहे. टायगर श्रॉफच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या चित्रपटात अभिनेत्यासोबत कोण दिसणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
उर्मिला मातोंडकर दिसणार ‘या’ वेब सीरिजमध्ये अॅक्शन अवतारात; ओटीटी पदार्पणासाठी आहे सज्ज
प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाला चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, “रामायनाची गोष्ट आहे का व्हीएफएक्स?