Wednesday, March 29, 2023

गर्लफ्रेंड म्हणून चालेल, पण अर्जुनची बायको बनायला तयार नाही मलायका? म्हणाली, ‘मला नाही जमायचं’

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे. त्यामुळेच या जोडप्याच्या लग्नाच्या बातम्याही सतत कानावर येत असतात. त्या दाेघांचे लग्न बघण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. अलीकडेच मलायकाने एका मुलाखतीदरम्यान तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्याबाबत माेठा खुलासा केला आहे, ज्यामध्ये ती अर्जुनसोबतच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल मोकळेपणाने बोलली आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) हिला एका मुलाखतीत लग्नाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर अभिनेत्री म्हणाली की, “मला वाटते की, लग्नाचे संविधान सुंदर आहे. तसेच, मला वाटत नाही की, तुम्ही लग्न करण्यासाठी घाई केली पाहिजे. ते एक सामाजिक दबाव आहे. कधीकधी पालक तुमच्यावर दबाव आणतात. मात्र, लग्न योग्य वेळी केले पाहिजे. तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल, तर ते सुंदरच आहे. जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हा मला असे वाटते की, मी आत्ता त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार नाही.”

बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच्याबद्दल बोलताना मलायका पुढे म्हणाली की, “मी अर्जुनशी फक्त अटॅच नाही, तर तो माझा खूप चांगला मित्रही आहे. तुमच्या जिवलग मित्रावर प्रेम करणे आणि प्रेमात पडणे खूप महत्वाचे आहे. अर्जुन मला भेटतो आणि तो मला समजून घेतो. मला वाटते की, आम्ही दोघे एकमेकांचे सर्वात मोठे चीअरलीडर्स आहोत. मी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलू शकते. मी फक्त अर्जुनच्या आसपास असू शकते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

याशिवाय मलायका अरोराला एका मुलाखतीत अरबाज खानसोबतच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर ती म्हणाली की, “तिच्यात आणि अरबाजमध्ये खूप चांगली समजूत आहे. दोन मार्ग वेगळे झाल्यापासून ही समज आता अधिक चांगली झाली आहे.” जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, “अरबाज आणि तिच्यात मैत्री का आहे?” यावर ती म्हणाले, “आमची परस्पर समज खूप चांगली आहे. तो एक शानदार व्यक्ती आहे. मी फक्त त्याला शुभेच्छा देऊ शकते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत लव्हलाइफ एन्जॅाय करत आहे. ती नेहमीच तिचे आणि अर्जुनचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत चाहत्यांना भुरळ पाडत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धाडस असावं तर असं! प्रिया निघाली भलतीच वॉरिअर, थेट वाघासोबत केले फोटोसेशन
‘आरआरआर’ सिनेमाची क्रेझ सातासमुद्रापार, चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी ‘नाटो नाटो’वर लावले ठुमके

हे देखील वाचा