Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड ‘स्पायडर मॅन’च्या ऑडिशनला गेला अन् त्यांनाच ऑफर देवून आला, टायगर श्रॉफचा किस्सा ऐकून व्हाल चकित

‘स्पायडर मॅन’च्या ऑडिशनला गेला अन् त्यांनाच ऑफर देवून आला, टायगर श्रॉफचा किस्सा ऐकून व्हाल चकित

बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफ(Tiger Shroff) याला स्टंटमॅन म्हणून ओळखला जातो. त्याचे जबरदस्त स्टंटस आणि डान्स मूव्ह्स पाहून कुणालाही घाम फुटला पाहिजे. त्याने त्याच्या कारकिर्दीत असा एकच चित्रपट केला आहे ज्यामध्ये तो सुपरहिरोच्या स्टाईलमध्ये दिसला होता, ज्याचे नाव होते ए फ्लाइंग जट. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या टायगरने स्पायडर मॅनसाठी ही ऑडिशन दिल्याचा मोठा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर याविषयी बोलताना अभिनेत्याने असेही सांगितले की, त्याने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते आणि त्याची टेपही मार्वलला पाठवली होती.

टोबी मैगुइरे, एंड्रयू गारफील्ड आणि टॉम हॉलेंड यांनी तीन वेगवेगळ्या चित्रपट मालिकांमध्ये स्पायडर-मॅनचे पात्र साकारले आहेत. गेल्या वर्षीच्या स्पायडर मॅन: नो वे होम या चित्रपटात हे तिघे एकत्र दिसले होते. मार्वल कॉमिक्समध्ये स्पायडर-मॅनचा एक भारतीय भाग देखील आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर त्याची भूमिका केलेली नाही. टायगर म्हणतो की, निर्माते त्याच्या व्हिडिओने खूप प्रभावित झाले आहेत. इतकंच नाही तर स्पायडर मॅन या चित्रपटात जे काही करेल ते करायला मी तयार असल्याचंही त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना सांगितले आहे.

टायगर श्रॉफने अलीकडेच एका कॅनेडियन एफएमला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याने एकदा स्पायडर-मॅनसाठी ऑडिशन दिले होते. त्याने निर्मात्यांना सांगितले की, मी व्हिएफएक्सवर तुमचे पैसे वाचवणार कारण स्पायडर मॅन त्याच्या चित्रपटात जे करतो ते मी करू शकतो. 2017 च्या स्पायडर-मॅन: फॉर फ्रॉम होमच्या हिंदी डबमध्ये अभिनेत्याने स्पायडर-मॅनचा आवाज दिला होता.

हिरोपंती २ मध्ये टायगर दिसला होता
टायगर श्रॉफ शेवटचा चित्रपट हिरोपंती 2 मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी दाखवली नाही. 70 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ 35 कोटींची कमाई केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य सुंदरीचा जलवा! बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’नेही धरला गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! 30 वर्षीय मॉडेलने फाशी घेत केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मागितली माफी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा