Tuesday, June 25, 2024

टायगरने दाखवले जबरदस्त मसल्स, पण नेटकऱ्यांकडून झाला भलताच ट्रोल; म्हणाले, ‘पँट वर कर…’

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक अभिनेते आहेत, जे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. त्यामध्ये टायगर श्रॉफ याच्या नावाचाही समावेश होतो. सन 2014मध्ये ‘हिरोपंती‘ या सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या टायगरने फिटनेस फ्रीक म्हणूनही त्याची ओळख निर्माण केली आहे. त्याने त्याच्या दमदार बॉडी, डान्स आणि ऍक्शनचा जलवा अनेक सिनेमात दाखवला आहे. त्यामुळे तरुणीही त्याच्यावर फिदा होतात. महत्त्वाचं म्हणजे, त्याच्यासारखी बॉडी बनवण्यासाठी चाहतेही प्रयत्न करतात. टायगर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. असाच एक फोटो त्याने शेअर केला आहे, पण त्यामुळे तो भलताच ट्रोल होत आहे.

खरं तर, टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक लेटेस्ट फोटो (Tiger Shroff Latest Photo) शेअर केला आहे. यामध्ये तो मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. टायगरने त्याच्या पायजमा काढून गुडघ्यापर्यंत घेतला आहे आणि त्याच्या पायाचे मसल्स दाखवत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नो स्लीप, नो रेस्ट और ना कोई नए कपडे.” म्हणजेच त्याने म्हटले आहे की, झोप नाही, आराम नाही आणि नवीन कपडेही नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

त्याच्या या फोटोवर लाखो लाईक्सचा वर्षाव होत आहे. त्याच्या फोटोला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 4 हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. यामध्ये अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “हा कसला पायजमा आहे?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “भैय्या, तू डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये जात आहे का?” आणखी एकाने कमेंट केली की, “सर, तुमची पँट घसरली. ती वर ओढा.” एक जण असेही म्हणाला की, “वेळेवर झोपत जा, नाहीतर मानसिकरीत्या कमकुवत होशील.”

टागर श्रॉफचा आगामी सिनेमा
टायगर श्रॉफ याच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या, तो अक्षय कुमार याच्यासोबत या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातही टायगरच्या दमदार ऍक्शन पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (actor tiger shroff show off his toned legs and body muscles in latest pic actor got trolled read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पती निकचाही असणार कॅमियो
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

हे देखील वाचा