राज कुंद्रा प्रकरणात मराठमोळ्या उमेश कामतच्या फोटोचा वापर, संतप्त अभिनेत्याकडून कारवाईचा इशारा


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रांचने अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपद्वारे पब्लिश केल्याच्या आरोपाखाली अटक केले आहे. तसेच त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे. तोच मुख्य गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत अनेक कलाकारांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. काहींनी राज हा निर्दोष असल्याचे देखील सांगितले आहे. त्याच्याबाबत आता आणखी नवनवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही दिवसांपूर्वी या प्रकारणाबाबत अटक केले आहे. याबाबत बरीच माहिती देखील समोर आली आहे.

राज कुंद्राचा पीए उमेश कामत याच्या नाव आणि फोटोत गोंधळ झालेला दिसून येत आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त देताना उमेश कामत या नावासोबत मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवला आहे. या बातम्यांमुळे अभिनेता उमेश कामत खूपच संतप्त झालेला दिसत आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (Marathi actor umesh kamat slams media for irresponsible journalism for showing his photo on Raj Kundra obsence film racket)

या प्रकरणानंतर उमेशने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जात आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानिसाठी या वृत्तवाहिन्यांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणा संबंधित मी योग्य ती कारवाई निश्चितच येईल.”

यासोबतच त्याने ज्या वृत्तवाहिन्यांनी त्याचा फोटो दाखवला आहे त्या वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शन दिले आहे की, “बेजबाबदार पत्रकारिता.” या विषयाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सगळे कलाकार त्याला पाठिंबा देत आहेत. तसेच वृत्तवाहिन्यांनी हे असे काही दाखवणे अजिबात अपेक्षित नाहीये. त्यामुळे सगळे संतप्त व्यक्त करत आहेत.

खरं तर पत्रकार हा आपल्या भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजात चालणाऱ्या अनेक घटना आणि सामान्य नागरिक यांच्यातील पत्रकार हा एक दुवा आहे. पण आता या अशा घटना समोर आल्याने सामान्य जनता संतप्त व्यक्त करत आहे.

उमेश कामत हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचा आणि एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये तसेच नाटकात काम केले आहे. त्याने ‘बाळकडू’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तो सध्या सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम करत आहे.

राज कुंद्रा याने अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपवर दाखवल्या प्रकरणी त्याला अटक केले आहे. क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, राज कुंद्राने त्याच्या या बिझनेसमध्ये 10 कोटी रुपये गुंतवले होते. खरं तर फेब्रुवारी महिन्यातच हा गोष्टीची माहिती मिळाली होती की, राज कुंद्राच्या कंपनीचा या सगळ्यांशी काहीतरी संबंध आहे. पण आता तसा ठोस पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये केलेल्या तपासावरून हे समोर आले होते की, राज कुंद्राची कंपनी काही छोट्या कलाकारांना वेबसीरिजमध्ये तसेच शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी लालच दाखवत होती. त्यानंतर त्यांच्याकडून ऑडिशनच्या नावाखाली काही शॉट्स करून घेतले जात होते. यामध्ये ते कलाकारांना तुम्हाला थोडा बोल्ड सीन करावा लागेल असे सांगायचे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.