प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स


सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ती अभिनेत्री इतर कोणी नाही, तर डोळा मारून चाहत्यांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियर आहे. प्रियाच्या डोळा मारण्याच्या व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला होता आणि एका रात्रीतच तिला भरभरून प्रसिद्धी मिळाली होती. अभिनयाव्यतिरिक्त प्रिया सोशल मीडियावरही कमालीचा वेळ घालवते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अशातच आता तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळत आहे.

प्रियाने आपला डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती क्रीम रंगाची साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर डान्स करताना दिसत आहे. प्रियाने रशियामध्ये मल्याळम गाण्यावर डान्स केला आहे. तसेच तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. (Actress Priya Prakash Varrier Dance In Saree In Russia Video Viral Wink Queen)

प्रिया प्रकाश वारियरचा धमाकेदार डान्स
प्रिया प्रकाश वारियरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “स्वत:मधील मल्याळीला जागवण्याचे निमित्त…” प्रियाच्या या व्हिडिओने प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे.

प्रियाच्या या व्हिडिओला काही तासातच १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आणि १ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओत ती मल्याळम गाण्यावर थिरकत आहे. तिचा हा अंदाज खूपच भारी आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत असून ते प्रियाची प्रशंसा करत आहेत.

प्रिया प्रकाश वॉरिअच्या यशाचा प्रवास
प्रिया प्रकाश वारियर सन २०१९ मध्ये तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा तिचा ‘ओरू अदार लव्ह’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यामध्ये प्रियाच्या डोळ्यांच्या इशाऱ्याच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच सन २०१८ मध्ये ती गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री बनली होती. २१ वर्षीय प्रिया प्रकाश वारियर केरळची राहणारी आहे. तिचे वडील सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंटमध्ये काम करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रितेश अन् सोनाक्षीच्या ‘ककुडा’ चित्रपटाची शूटिंग सुरू, ‘हा’ मराठमोळा निर्माता पहिल्यांदाच करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.