Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड वरुण धवनने संजय दत्त स्टाईलमध्ये केला व्हिडिओ शेअर, टपोरी लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

वरुण धवनने संजय दत्त स्टाईलमध्ये केला व्हिडिओ शेअर, टपोरी लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने 2012 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वरुण धवनला चित्रपटसृष्टीत येऊन जवळपास 10 वर्षे झाली आहेत. या 10 वर्षांत त्याने ‘मैं तेरा हीरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘दिलवाले’, ‘बदलापूर’  सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांसाठी त्याचे खूप कौतुकही झाले आहे. अशातच वरुण धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओतील वरुणचा (Varun Dhawan) लूक खूपच आश्चर्यकारक आहे. व्हिडिओमध्ये त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या जीन्ससह जॅकेट घातले आहे. वरुणने गळ्यात चेन घातली असून लांब केसांमध्ये तो टपोरी लूकमध्ये दिसत आहे. त्याचवेळी बॅकग्राउंडमध्ये संजय दत्तचे ‘कॉलर को थोडा सा ऊपर चढ़ा के’ हे गाणं वाजत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वरुणने लिहिले की, छावागिरी. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वरुणचा आगामी चित्रपटातील हा लूक असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. मात्र, हा त्याच्या नव्या चित्रपटाचा लूक नसल्याचे वरुण धवनने स्पष्ट केले आहे. काही यूजर्सना अभिनेत्याची ही स्टाईल आवडली आहे, तर काही लोक त्याची खिल्ली उडवत आहे. एका युजरने तर असेही म्हटले की, “तो संजय दत्तपेक्षा रज्जाक खानसारखा दिसतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

अभिनेत्याच्या या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नुकताच वरुण धवन करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अनिल कपूरसोबत दिसला होता. यादरम्यान त्याने अनिल कपूरचा पुतण्या अर्जुन कपूरची खिल्ली उडवली होती.

वरुणच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, वरुण अनिल कपूरसोबत ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात अखेरचा दिसला होता. ‘बवाल’ आणि ‘भेडिया’ या चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धाडकन तोंडावरच आपटला प्रसिद्ध रॅपर, वेदनेने विव्हळत होता गायक
नवाब सैफचा मजेशीर खुलासा! फार्महाऊसवर कोंबड्या पकडण्यासाठी ठेवलाय ‘कोंबडा’, पाहा व्हिडिओ
वनपीसमध्ये मौनीच्या मनमोहक अदा, पाहताक्षणीच पडाल प्रेमात!

हे देखील वाचा