Friday, March 29, 2024

नवाब सैफचा मजेशीर खुलासा! फार्महाऊसवर कोंबड्या पकडण्यासाठी ठेवलाय ‘कोंबडा’, पाहा व्हिडिओ

अभिनेता सैफ अली खान याचा ‘विक्रम वेधा‘ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमात सुपरस्टार ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. सध्या तरी हे दोघेही त्यांच्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. यासाठी ते त्यांच्या कलाकार मित्रांची भेटही घेत आहेत. अशातच त्यांनी ‘द कपिल शर्मा शो‘चेही दार ठोठावले आहे. यावेळी त्यांनी चांगलीच मजा-मस्ती केली आहे. सोबतच हेही सांगितले की, त्याने त्याच्या फार्महाऊसवर कोंबड्या पकडण्यासाठी कोंबडाही ठेवला आहे. चला तर नेमकं प्रकरण जाणून घेऊया…

कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या टॉक शोमध्ये जेव्हाही कोणत्या सिनेमाची टीम प्रमोशनसाठी येते, तेव्हा नक्कीच यामध्ये मजा-मस्ती झाल्याशिवाय राहत नाही. यावेळीही असंच काहीसं झालं. ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला सैफ अली खान (Saif Ali Khan) जेव्हा शोमध्ये पोहोचला, तेव्हा कपिलने त्याचा पाय खेचण्याची संधी सोडली नाही.

कपिलने यावेळी सैफला विचारले की, “‘भूत पोलीस’मध्ये तुम्ही भूतांना पकडत होता, ‘बंटी बबली’मध्ये खोट्या बंटी बबलीला पकडत होता, ‘विक्रम वेधा’मध्ये ऋतिक साहेबांना पकडत आहात. एकूणच तुम्ही पकडण्यात खूपच माहीर आहात. अशात जेव्हा तुम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाता, तेव्हा तिथे कोंबड्यांना स्वत: पकडता की, कुणी माणूस ठेवलाय?” कपिलच्या या प्रश्नावर सैफने हुशारीने उत्तर दिले. तो म्हणाला की, “त्यासाठी आम्ही कोंबडा ठेवलाय.” सैफ असे म्हणताच सर्वजण हसू लागले.

केव्हा प्रदर्शित होणार सिनेमा?
सैफ अली खान आणि ऋतिक रोशन अभिनित ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा याच महिन्यात म्हणजे 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा याच नावाने प्रदर्शित झालेल्या तमिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. त्या सिनेमात विजय सेतुपती आणि आर माधवन हे मुख्य भूमिकेत होते. सध्या या सिनेमातील ‘अल्कोहोलिया’ हे गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, ऋतिक या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तर खपवून घेणार नाही…’ मिमिक्री केल्यानंतर उषा नाडकर्णी यांचा थेट श्रेया बुगडेला कॉल
एमएमएस व्हिडिओप्रकरणी अंकिताचे कळकळीचे आवाहन; म्हणाली, ‘आपल्या घरी आई-बहिणी आहेत, कृपया…’
‘काश्मिर फाईल्स’चा विक्रम मोडताच संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘मी या फालतू स्पर्धेत…’

हे देखील वाचा