बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने त्याच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून पत्नी नताशा दलालला चित्रपटाच्या डेटवर नेले. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागला. वरूण त्याच्या पत्नीचे रक्षण करताना दिसला, जे पाहून वरुणचे चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत तसेच दोघांना हनी-बनी कपल असे म्हटले गेले आहे.
वरुण धवन सध्या त्याच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिज ‘सिटाडेल: हनी बनी’मुळे चर्चेत आहे. वरुणने ३ जून २०२४ रोजी त्याच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आपल्या छोट्या एंजलच्या आगमनानंतर, वरुणचं पत्नीविषयी प्रेम वाढलं आहे. अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ चित्रपट पाहण्यासाठी वरुण पत्नी नताशासोबत थिएटरमध्ये गेला होता. नवीन पालक झालेले वरुण धवन आणि नताशा दलाल एकमेकांसोबत खूप क्यूट दिसत होते.
या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये वरुण आणि नताशा मुंबईतील एका प्रसिद्ध सिनेमागृहात जाताना दिसत आहेत. वरुणने हिरवा आणि पांढरा ऍथलीझर सेट परिधान केला होता. तर नताशा नेहमीप्रमाणेच साधी आणि क्यूट दिसत होती. दोघांना एकत्र पाहून चाहते सोशल मीडियावर सतत कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘क्यूट कपल’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘हनी बनी एकत्र सुंदर दिसत आहे’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘दोघे नेहमी असेच आनंदी रहा’.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
अनेकांनी मला वेळोवेळी नाकारलं …! तुषार कपूरने व्यक्त केली करियर विषयी खंत