Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

असं काय झालं की, लक्झरी साेडून वरुण करताेय ऑटाे रिक्षाने प्रवास; व्हिडिओ पाेस्ट करत सांगितले कारण

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या ‘भेडिया‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर लोकांना खूप आवडला. टीझरनंतर या चित्रपटाची बरीच चर्चा चाहत्यांमध्ये हाेत आहे. क्रिती सेननसोबतच्या या आगामी चित्रपटात वरुणच्या लूकची झलकही पहायला मिळाली. आता वरुण धवन त्याच्या आलिशान गाड्यांना साेडून ऑटो रिक्षा चालवताना दिसत आहे.

वरुण हा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. अलीकडेच अभिनेता वरुण धवन (varun dhawan) ऑटो रिक्षा चालवताना दिसला. त्याचा एक व्हिडिओ वरुण धवननेही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वरुण धवन ऑटो रिक्षा चालवत मुंबईच्या हवामानाचा आनंद घेत आहे. या पाेस्टवर चाहते लाईक आणि कमेंट्स करुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. गुरूवारी (दि. 13 ऑक्टाेबर) करवा चौथच्या निमित्ताने वरुणने पत्नी नताशा दलालसोबतचा पारंपरिक ड्रेसमध्ये साेशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. हे फोटो पोस्ट करत वरुणने त्याच्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

भेडीया चित्रपटाच ट्रेलर 19 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
वरुण धवन 25 नोव्हेंबरला ‘भेडिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. वरुणचा हा चित्रपट 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात क्रिती सेननही दिसणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाचा टीझर पसंतीस उतरला आहे. तसेच ‘भेडिया’ चित्रपटाचा ट्रेलर 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

वरुण धवर ओटीटीमध्ये करणार पदार्पण
वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर वरुणचे चित्रपट सतत चर्चेत असतात. यासोबतच वरुण ओटीटीमध्येही पदार्पण करणार आहे. भेडिया या चित्रपटानंतर तो ‘इक्कीस’मध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त ताे ‘Citadel’ या मालिकेद्वारे ओटीट मध्ये पदार्पण करत आहे. जान्हवी कपूरसोबत वरुण ‘किट्टी’ या चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
खुशखबर! दिवाळीच्या आधीच ‘भाईजान’चा मोठा धमाका, चाहत्यांना ‘टायगर 3’ रिलीज डेट टाकली सांगून

एकेकाळी ‘गुड्डू भैय्या’कडे कॉलेजची फी भरायलाही पैसे नसायचे, पहिल्या पगाराचा आकडा माहितीये? वाचा अलीची संघर्षगाथा

हे देखील वाचा