Monday, July 15, 2024

ड्रायव्हर मनोज यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे तुटलाय वरुण धवन; म्हणाला, ‘२६ वर्षांपासून ते माझ्यासाठी…’

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला (Varun Dhawan) त्याचा ड्रायव्हर मनोज साहू यांच्या निधनाने धक्का बसला आहे. मनोज यांचे मंगळवारी (१८ जानेवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुधवारी (१९ जानेवारी) त्यांची आठवण करून, वरुणने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत एक भावनिक नोट देखील लिहिली आहे.

थ्रोबॅक व्हिडिओ केला शेअर
वरुणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एका कार्यक्रमाचा जुना व्हिडिओ पोस्ट करत वरुणने लिहिले की, “मनोज दादा गेल्या २६ वर्षांपासून माझ्या आयुष्यात होते. ते माझे सर्वस्व होते. या क्षणी माझ्या वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, पण माझी इच्छा आहे की, लोकांनी त्यांची अद्भूत बुद्धिमत्ता, त्यांची विनोदबुद्धी आणि जीवनाबद्दलची त्यांची आवड लक्षात ठेवावी. मनोजदादा तुम्ही माझ्या आयुष्यात होता याबद्दल मी सदैव ऋणी राहीन.”

व्हिडिओमध्ये दिसतेय वरुण-मनोजची जोडी
या व्हिडिओमध्ये वरुण त्याचा ड्रायव्हर मनोज यांच्यासोबत स्टेजवर दिसत आहे. वरुण म्हणतो की, “हे खरं आहे की, मला नेहमी पाठीवर थाप दिली जाते. ते माझे ड्रायव्हर मनोज आहेत. ते माझ्यासोबत वर्षानुवर्षे काम करत आहेत आणि नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले आहे.” त्यानंतर वरुण त्यांना स्टेजवर बोलावतो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, “ते माझ्या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत आहेत.”

स्टार्सनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
वरुणच्या पोस्टवर कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री स्वरा भास्करने लिहिले की, “मनोज दादाच्या कुटुंबियांना आणि वरुणबद्दल शोक व्यक्त करते.” आयुष्मान खुरानाने लिहिले की, “भाऊ मनापासून संवेदना.” अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लिहिले की, “वरुण तुझ्या नुकसानाबद्दल खेद आहे.” सिद्धांत कपूर म्हणाला, “माफ करा भाऊ, ते एक अद्भुत व्यक्ती होते. निष्ठा आणि प्रेमाने भरलेले. देव त्यांच्या आत्म्याला शांती दे. तुझ्यावर प्रेम आहे, माझ्या भावा.” याशिवाय इतर स्टार्सनीही शोक व्यक्त केला आहे.

मनोजचा हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
माध्यमांतील वृत्तानुसार, मनोज यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेच्या वेळी वरुण वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता. याची माहिती मिळताच वरुण थेट रुग्णालयात गेला.

हेही वाचा :

हे देखील वाचा