Monday, July 15, 2024

‘सामी सामी’ गाण्यावर थिरकली गौहर खान, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

सध्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक कलाकार या गाण्यावर त्यांचा व्हिडिओ बनवत आहेत. अशातच गौहर खानने देखील या गाण्यावर व्हिडिओ केला आहे. गौहर खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. पुष्पा सिनेमातील  सामी सामी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे. पुष्पा या सिनेमात या गाण्यावर ती रश्मिका मंदाना हिने डान्स केला होता आणि हे गाण एका रात्रीत सुपरहिट झाले. अनेक अभिनेते अभिनेत्री या गाण्यावरती डान्स करतानाचा विडिओ टाकत आहेत. सध्या गौहारचा विडिओ फार चर्चेत आहे.

गौहार खान आपल्या डान्समुळे सतत चर्चेत असते. तिची सुंदरता, राहिणीमान आणि एकूणच तिचा अंदाज चाहत्यांना फार भावतो. ती आपल्या चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करत असते. गौहरचा फार मोठा चाहतावर्ग आहे. तिचे वेगवेगळे अंदाज जाताना नेहमी भुरळ घालत असतात. (gauahar khan share a sami sami dance video on social media)

तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. मूळ सिनेमांमध्ये या गाण्यावर ती रश्मिका मंदाना हिने डान्स केला होता. त्या गाण्याने लोकांना एवढी भुरळ पाडली ती जो तो त्या गाण्यावर ती थिरकत होता. गौहरच्या डान्सवर चाहत्यांनी अशी प्रतिक्रिया दिली रश्मिकापेक्षा ही आहे तू खूप सुंदर डान्स केला आहेस. अनेक सेलिब्रिटीनी देखील ही प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे असे दिसून येते.

हेही वाचा :

हे देखील वाचा