Sunday, July 14, 2024

पावर कपल म्हणून ओळखले जाणारे धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांची करोडोंची संपत्ती जाणून व्हाल आश्चर्यचकित

दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील पावर कपल धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी १७ जानेवारीच्या रात्री वेगळे होण्याची घोषणा करून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. हे जोडपे अशा प्रकारे त्यांचे १८ वर्ष जुने नाते संपुष्टात येईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. दोघांनी २००४ मध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. लग्नाच्या वेळी ऐश्वर्या २३ वर्षांची होती, तर धनुष २१ वर्षांचा होता. दोघांनी एकमेकांना वर्षानुवर्षे साथ दिली पण त्यांना तसे पॉवर कपल म्हटले गेले नाही.

धनुषने (Dhanush) दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत दीर्घ खेळी खेळली आहे. त्यांनी २५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. साऊथसोबतच धनुषला बॉलिवूडमध्येही घेतले जात आहे. आतापर्यंत, त्याने ‘रांझना’, ‘शमिताभ’ आणि ‘अतरंगी रे’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि आता त्याची लोकप्रियता केवळ दक्षिणेतच नाही, तर संपूर्ण भारतात पसरली आहे.

धनुष हा केवळ अभिनेताच नाही, तर एक प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, पटकथा लेखक आणि पार्श्वगायक देखील आहे. धनुषने २००२ मध्ये चित्रपटांमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याचबरोबर ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth) दिग्दर्शिका म्हणून दक्षिण चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. त्याने ३ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले ज्यामध्ये धनुष मुख्य भूमिकेत होता. दक्षिणेतील दिग्गज घराण्यातील धनुष आणि ऐश्वर्या यांची संपत्ती करोडोंमध्ये आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, दोघांची संयुक्त संपत्ती सुमारे १७७ कोटी आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, २०२० पर्यंत धनुषची एकूण संपत्ती सुमारे १४२ कोटी रुपये होती, तर ऐश्वर्याची एकूण संपत्ती ३५ कोटी इतकी आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर दोघेही यात्रा आणि लिंगा या दोन मुलांचे पालक आहेत. आता त्यांच्या घटस्फोटामुळे त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा