Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शेकडो नियमांना तोडून समोर आला विकी आणि कॅटरिनाचा लग्नानंतरचा पहिला फोटो; एकदम क्यूट जोडी!

सिनेसृष्टीत मागील काही दिवसांपासून एक विषय चांगलाच रंगला होता. तो म्हणजे अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांचे लग्न होय. त्यांच्या लग्नासाठी चाहते खूपच उत्सुक होते. आता त्यांच्या लग्नाबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विकी आणि कॅटरिना यांनी गुरुवारी (०९ डिसेंबर) लग्नगाठ बांधली आहे. त्यांचे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे पार पडले. त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लग्नाआधीच्या सर्व मजेशीर उत्सवानंतर, बॉलिवूडचे जोडपे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुरुवारी अखेर लग्न केले. त्यांच्या लग्नाचा एक फोटो एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो जरी धुसर असला, आणि यामध्ये नवविवाहित जोडप्याचा चेहरा दिसत नसला, तरीही फटाके मात्र दिसत आहेत. विकी आणि कॅटरिना किल्ल्याच्या बाल्कनीत उभे असून त्यांच्या लग्नाच्या पोशाखात दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सोमवारी (६ डिसेंबर) कॅटरिना, विकी आणि त्यांचे कुटुंबीय लग्नासाठी भव्य रिसॉर्टमध्ये पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी लग्नपूर्व उत्सवाला सुरुवात झाली. मंगळवारी या जोडप्याचा मेहंदी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ८ डिसेंबरला हळदी आणि संगीत होते. आता कॅटरिना आणि विकी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. या जोडप्याला खासगी लग्न हवे होते आणि त्यांनी एक कार्यक्षम टीम नियुक्त केली, ज्यांनी विवाहस्थळावरून कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ लीक होणार नाहीत, याची खात्री केली.

कॅटरिना आणि विकीचे कुटुंब आज संध्याकाळी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. तसेच, एक अनौपचारिक समारंभ असू शकतो, जेथे कॅटरिनाचा भाऊ, सेबॅस्टियन लॉरेल मिशेल भाषण देईल.

हेही वाचा-

हे देखील वाचा