कॅटरिना आणि विकीच्या शाही लग्नातील काही गोष्टी पाहून ट्रोलर्सला मिळाले खाद्य, पाहा त्यांच्यावर आधारित फनी मिम्स


कॅटरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) आज (९ डिसेंबर)ला राजस्थान येथील सवाई माधेपूर येथे विवाह बंधनात अडकत आहे. त्यांचा हिंदू परंपरेनुसार विवाह संपन्न होणार असून, त्यानुसार लग्नाआधी होणारे सर्व कार्यक्रम पार पडले आहे. सर्वत्र फक्त त्यांच्या लग्नाच्याच चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. कॅटरिना आणि विकी यांचे हे शाही लग्न अगदी छोट्या गोष्टींमुळे देखील चर्चेत आले आहे. लग्नाच्या ठिकाणापासून, ते भाज्या, केक आदी अनेक गोष्टींपर्यंत या दोघाचे लग्न प्रकाशझोतात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या नावाने नाही तर त्यांना मिळालेल्या विशिष्ट कोडने ओळखले जाणार असून, याच कोडने त्यांना हॉटेलमध्ये देखील एन्ट्री मिळणार आहे. असे देखील म्हटले जाते की कोड सांगूनच लग्नामध्ये एन्ट्री मिळत आहे.

लग्नामध्ये सहभागी असणाऱ्या पाहुण्यांना एक नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंट पण साईन करावे लागले. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नामध्ये कडक सुरक्षतेची व्यवस्था केली आहे. लग्नाची कोणतीही माहिती थोडीपण बाहेर येऊ नये यासाठी चोख बंदोबस्त केला गेला आहे. या सुरक्षा व्यवस्थेवरून सोशल मीडियावर खूप मिम्स देखील बनवले जात आहे. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातील काही सीन घेऊन, काही फोटो घेऊन ते मिम्स  बनवले आहेत आणि त्या फोटो वरती किंवा व्हिडिओ वरती एकदम मजेदार कॅप्शन देऊन ते शेअर केले आहेत. इतकेच नाही तर कॅटरिनाचा माजी प्रियकर सलमान खान (Salman Khan) वर देखील विविध मिम्स बनवून त्याला खूप ट्रोल केले जात आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नावरील व्हायरल होणारे हे मजेदार मिम्स पाहूया.

 

विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नात असलेले नियम, अटी यावरून यूजर्स विविध भन्नाट मीन्स तयार करू ते व्हायरल करत आहे. त्यांच्या लग्नातील सुरक्षा दल असो किंवा पाहुण्यांना दिलेला कोड. सलमान खान, रणबीर कपूर यांच्यावर भरपूर मिम्स तयार करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरती हे मिम्स तुफान व्हायरल होत असून, प्रत्येक जण या मिम्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!