तुम्हाला माहितीये का सलमान अन् कॅटरिनाच्या पहिल्या भेटीचा किस्सा? व्यायाम करताना…


एकेकाळी सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या प्रेमाचे किस्से सर्वांसाठी सामान्य होते. मात्र, या दोघांनी यावर कोणतेही वक्तव्य केले नव्हते. माध्यमांतील वृत्तांनुसार, हे दोघे खूप काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर कॅटरिनाचे नाव रणबीर कपूरशी (Ranbir Kapoor) जोडले गेले, पण त्यांचे देखील रिलेशन जास्त काळ टिकले नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला.

कॅटरिना आणि रणबीर जरी खऱ्या आयुष्यात एकत्र नसले, तरीसुद्धा या दोघांची ऑनस्क्रीन जोडी चाहते आणि प्रेक्षकांना अजूनही आवडते. या दोघांचे आतापर्यंत आलेले चित्रपट प्रेक्षकांचे आवडते चित्रपट आहेत. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, पण आता कॅटरिना विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची चर्चादेखील खूप जोरात आहे.

सलमान खान आणि कॅटरिनाची पहिली भेट
सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची पहिली भेट कशी झाली, याबाबत स्वतः सलमानने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याच्या बहिणीने कॅटरिनाचे नाव घेतले होते. बहिणीद्वारे तो कॅटरिनाला भेटला होता. त्यांची भेट एका एरोबिक्स क्लासमध्ये झाली होती. व्यायाम करण्यासाठी कॅटरिना डबल बर्गर खात येत होती. ते पाहून सलमान खान आश्चर्यचकित झाला होता. या शोदरम्यान सलमान खानने कटरीना कैफची खूप चेष्टा केली होती.

सलमान खान नाही जाणार कॅटरिनाच्या लग्नाला
जेव्ही कॅटरिना कैफने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, तेव्हा सलमानने तिची मदत केली होती. एवढंच नाही, तर सलमान खानला कॅटरिनाचा गॉडफादर देखील म्हटले जाते. पाठीमागील काळात दोघांचे नाते कसेही असो, परंतु दोघांमध्ये खास नाते आहे. असे देखील म्हटले जाते की, कॅटरिना कैफच्या लग्नामध्ये सलमान खानचे कुटुंब देखील सहभागी होणार आहे. मात्र, सलमान खानच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य आतापर्यंत सवाई माधोपूर येथे पोहोचलेले नाही. तसेच, सलमान खान देखील कामानिमित्त देशाच्या बाहेर गेला आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!