बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नाबाबत रोज काही ना काही माहिती समोर येत आहे. अलिकडेच त्यांनी त्यांच्या लग्नाच्या पाहुण्यांची यादी तयार केली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. विकी आणि कॅटरिना यांच्या लग्नाची बातमी सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत एकामागून एक अपडेट्स येत आहेत आणि चाहत्यांना सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. विकी आणि कॅटरिनाशी संबंधित प्रत्येक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. मग ते लग्नाचे ठिकाण असो किंवा संगीत, मेहंदीची थीम असो. यावेळी देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कॅटरिनाची आई सुझैन एका जुन्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्यांच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. परंतु यावेळी त्यांनी पॅपराजींसाठी पोझ दिली नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये कारची नंबर प्लेटही दिसत आहे. ज्याला पाहून चाहते म्हणत आहेत की, ही विकीची जुनी कार आहे. एका चाहत्याने विकीच्या जुन्या कारसोबत हार्ट इमोजी पोस्ट केल्याचे सांगितले. तर तिकडे दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “अरे ही विकीची कार आहे.”
कॅटरिना आणि विकी यांच्या लग्नाचे फंक्शन ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि ९ डिसेंबरला दोघे एकमेकांसोबत सात फेरे घेणार आहेत. पाहुण्यांच्या पाहुणचारापासून ते लग्नाच्या सुरक्षेपर्यंत अत्यंत चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विकी कॅटरिना हॉटेल सिक्स सेन्समध्ये लग्न करणार आहे. लग्नात अनेक व्हीआयपी सेलिब्रिटी सामील होणार आहेत तसेच अनेक बडे सेलिब्रिटी देखील त्यांचे धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार असल्याची देखील माहिती आहे.
लग्नाच्या वेळी फक्त हॉटेल कर्मचारी आणि पाहुण्यांना आत प्रवेश दिला जाईल. हॉटेल व्यवस्थापनही लग्नाच्या सजावटीपासून ते सुरक्षेच्या व्यवस्थेत कोणतीही कसर सोडू इच्छित नसल्याने हॉटेलचे कर्मचारी लग्नाच्या वेळी मोबाईल सोबत ठेवणार नाहीत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर
‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल










