तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर


महाराष्ट्रात चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर ‘झिम्मा’ हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने नुसता धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र या चित्रपटाची चर्चा चालु आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. हा चित्रपट हाऊसफुल झाला आहे. नुकतेच ‘झिम्मा’चा टीमने त्यांची सक्सेस पार्टी साजरी केली आहे. कलाकार त्यांना जमेल तसे प्रमोशन करत आहेत. तिसरा आठवडा चालू झाला आहे, तरी देखील हा चित्रपट सर्वत्र हाऊसफुल आहे. अशातच या चित्रपटाचा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने एका चित्रपटगृहाला भेट दिली आहे. तेथील हाऊसफुल दृश्य त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत हेमंत ढोमे देखील दिसत आहे. त्यांनी वाशीमधील ग्रँड सेंट्रल मॉल सिनेपॉलेस येथे भेट दिली आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, तिसरा आठवडा प्रेक्षक अजिबात कमी झालेले नाही, हे बघा. यानंतर तो चित्रपटगृहात असलेले प्रेक्षक दाखवतो. (Marathi actor Siddharth chandekar share housefull scene of jhimma)

‘झिम्मा’चे पहिल्या आठवड्यात ३२५ शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ७०० पेक्षा जास्त म्हणजेच दुप्पटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे ५० टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटाने ५.८३ कोटींचा टप्पा पार केला. लॉकडाऊननंतर सुपरहिट ठरलेला ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिकनी केले असून हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


Latest Post

error: Content is protected !!