‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


आजकाल अनेक मोठे कलाकार छोट्या पडद्यावर पदार्पण करताना दिसत आहेत. प्रेक्षकांचे आवडते कलाकार दररोज त्यांना भेटायला त्यांच्या घरी येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. अशातच सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत दिसत आहेत.

प्रेम करणारी दोन माणसे एकमेकांपासून दुरावून अनेक वर्षांनी एकत्र भेटतात. ही सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे. उमेश आणि मुक्ता यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांची फॅन फॉलोविंग देखील तेवढी जास्त आहे. अशातच या मालिकेतून मीरा आणि तिची लहान बहीण मनू यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Ajunahi barsat aahe actors dance on natu natu song, video viral on social media)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्या दोघीही ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे. त्या दोघांनी डोळ्यावर गॉगल लावला आहे. त्या साऊथ इंडियन स्टाईलने डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील यात काही शंकाच नाही. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ”नाटु नाटु” हे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत नुकतेच मीरा आणि आदीराजचे लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण होते. एवढ्या वर्षांनी दोघांचे लग्न झाले आहे त्यामुळे मीरा आणि आदीराज खूप खुश आहेत. परंतु मध्येच त्यांच्या घरच्यांना त्यांच्या अफेअरबद्दल समजते त्यामुळे आता मालिकेतील सूत्र पुन्हा बदलताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


Latest Post

error: Content is protected !!