बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नाबाबत रोज काही ना काही माहिती समोर येत आहे. अलिकडेच त्यांनी त्यांच्या लग्नाच्या पाहुण्यांची यादी शेअर केली. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे दोघेही पुढच्या आठवड्यात लग्न करणार असल्याचा दावा माध्यमांतील वृत्तामध्ये केला जात आहे. या लग्नाबाबत या जोडप्याने किंवा जिल्हा प्रशासनाने कोणताही दुजोरा दिलेला नाही. जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (२ डिसेंबर) जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांना आदेश जारी करून, शुक्रवारी (३ डिसेंबर) सकाळी १०.१५ वाजता बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकी आणि कॅटरिना यांच्या लग्नाचा आढावा घेणे, हा या बैठकीचा उद्देश होता. अतिरिक्त जिल्हा अधिकारी सूरजसिंग नेगी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही बैठक जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये एसपी हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी होते.
दुर्दैवाने चाहत्यांना विकी-कॅटरिनाच्या भव्य लग्नाची झलक पाहायला मिळणार नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, विकी- कॅटरिनाच्या पाहुण्यांसाठी एसओपी तयार झाल्यानंतर आणखी एक माहिती समोर आली आहे. यानुसार, विकी आणि कॅटरिनाचे लग्न होत असलेल्या मालमत्तेजवळ कोणताही ड्रोन आढळल्यास तो पाडण्यात येईल. सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ आणि फोटो शेअर होणार नाही, याची खात्री करण्यासाठी हे आहे.
लग्नस्थळाजवळ उडणाऱ्या ड्रोनला पाडणार खाली
विकी आणि कॅटरिना यांनी त्यांच्या पाहुण्यांना फोटोशिवाय एनडीए करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. किंबहुना लग्न गोपनीय ठेवण्यासाठी लग्नस्थळाजवळ उडणारे ड्रोनही खाली पाडले जाईल. हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की, लग्नाचे कोणतेही फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन लीक होणार नाहीत.
पाहुण्यांना गुप्त कोडद्वारे मिळणार प्रवेश
माध्यमांतील वृत्तानुसार, कॅटरिना आणि विकीचे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडेल. ६ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना गुप्त कोडच्या आधारे प्रवेश दिला जाईल. लग्नात सहभागी होणाऱ्या सर्व पाहुण्यांची ओळखही गुप्त ठेवण्यात येणार आहे. हॉटेलच्या खोलीलाही दिलेल्या कोडवरून प्रवेश मिळेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा










