लग्नानंतर विकीचा ‘हा’ व्हिडिओ लावतोय चाहत्यांना वेड; नेटकरी म्हणाले, ‘वहिनी व्हिडिओ…’

मागील वर्षी ९ डिसेंबर रोजी अभिनेता विकी कौशलने अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यानंतर या जोडप्याने अधिकृत सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो शेअर केले होते. दोघांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या होत्या. आता विकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो आता जोरदार व्हायरल होत आहे.

खरं तर हा व्हिडिओ विकीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओत तो जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओतील त्याचे जबरदस्त मूव्हज पाहून तुम्हीही थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना इतका आवडला आहे की, नेटकरी विकीच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. यातील एकाची कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

काय आहे ती कमेंट?
विकीच्या डान्स व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “वहिनी व्हिडिओ शूट करत आहेत का?” विकीच्या या डान्स व्हिडिओला आतापर्यंत ६७ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

रविवारी (०९ जानेवारी) कॅटरिना कैफने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोत ती तिचा पती विकीच्या मिठीत दिसली होती. फोटोत कॅटरिनाने काळ्या रंगाचा टॉप घातल्याचे दिसत आहे, तर विकी निळ्या रंगाच्या फुल स्लीव्ह टी-शर्टमध्ये दिसत आहे. फोटो पोस्ट करत कॅटरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या प्रेमाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन.”

विकी कौशल सध्या सारा अली खानसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या तो मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सारा आणि विकी ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या नव्या जोडीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

विकीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने मुख्य अभिनेता म्हणून सन २०१५ मध्ये आलेल्या ‘मसान’ या चित्रपटातून  बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

हेही वाचा-

Latest Post