Wednesday, July 3, 2024

विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  अलीकडेच, अभिनेत्याने घोषणा केली होती की, हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. पण अद्यापही त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आता विक्की कौशलने चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात विकी कौशल उधम सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.

विक्कीची खास झलक ४६ सेकंदाच्या टीझरमध्ये दिसली नाही. पण पासपोर्टवर त्याचा चेहरा दिसत आहे. टीझरमध्ये अनेक पासपोर्टसह सरदार उधम सिंग यांचा पासपोर्ट देखील तयार केला जात आहे. या पासपोर्टमध्ये विक्की कौशल उधम सिंगच्या लूकमध्ये दिसत आहे. डोक्यावर पगडी, चेहऱ्यावर दाट दाढी आणि डोळ्यांमध्ये उत्कटता असलेल्या या लूकमध्ये विक्कीला ओळखणेही कठीण झाले आहे. याशिवाय टीझरमध्ये उत्तम बॅकग्राऊंड म्युझिकही ऐकू येत आहे.

विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘सरदार उधम’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला असुन, टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की, विकी कौशलचा फोटो भारतीय पासपोर्टवर लावला आहे. यानंतर, इतर पासपोर्ट दिसतात, जे उधम सिंग, फ्रँक ब्राझील, शेर सिंग यांचे आहेत. या सर्व पासपोर्टमध्ये सरदार उधम सिंग यांचा पासपोर्ट सर्वात वर ठेवण्यात आला आहे.

टीझर शेअर करताना विक्की कौशलने एक कॅप्शनही लिहिले आहे. विक्की कौशलने लिहिले की, “शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मला त्यांचे सहकारी सरदार उधम सिंग एक माणूस, अनेक आडनावे, एक मिशनची कथा आणताना अभिमान वाटतो. हा आहे सरदार उधमचा टीझर.”

‘सरदार उधम’ हा चित्रपट क्रांतिकारी सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित असून, यात विक्की कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सरदार उधम सिंग यांनी १९४० मध्ये अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडातील मृत्यूचा बदला घेण्यासाठी जनरल डायरला लंडनमध्ये गोळ्या घातल्या. त्यांच्या शौर्याच्या एकापेक्षा जास्त कहाण्या इतिहासाच्या पानावर नोंदवल्या गेल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा