Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला प्रेक्षकांनी आतापर्यंत चित्रपटांमध्ये स्टंट करताना पाहिले असेल, पण आता विकी खऱ्या आयुष्यात कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. विकी बेअर ग्रिल्ससोबत दिसणार आहे. अलीकडच्या काळात, डिस्कव्हरी चॅनेलवरील सर्वात लोकप्रिय शो ‘इन टू द वाइल्ड’चा होस्ट बेअर ग्रिल्सची बॉलिवूड कलाकारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अक्षय कुमार, रजनीकांत आणि अजय देवगणनंतर आता विकी कौशल या धाडसी शोमध्ये भाग घेणार आहे.

मात्र, आजकाल विकी त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. विकी आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत या पोस्टमुळे विकीच्या शोमध्ये सहभागी होण्याबाबत चाहत्यांची चिंता वाढली आहे.

पोस्ट शेअर करताना विकीने लिहिले की, “सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्ससोबत लाइफ टाईमचा ॲडव्हेंचर अनुभव. माझ्यासाठी काय नियोजन आहे ते पुढे पाहूया. १२ नोव्हेंबरला शोचा प्रीमियर होईल.”

चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रियांनी भरला कमेंट बॉक्स
सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही खूप मजेदार येत आहेत. एकीकडे चाहते त्याचे या शोसाठी खूप अभिनंदन करत आहेत, तर दुसरीकडे लग्नाच्या वेळी विकीला दुखापत होऊ नये, याची अनेक चाहत्यांना काळजी आहे. त्याचवेळी विकीची मैत्रिण आणि अभिनेत्री मालविका हिनेही यावर प्रतिक्रिया देत लिहिले, “तू माझे स्वप्न जगत आहेस.”

‘सुखरूप परत या…’
चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “विकी लग्नाच्या ॲडव्हेंचरच्या आधी आणखी एका ॲडव्हेंचर प्रवासाला जात आहे.” दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, “लग्नापूर्वी सर्व ॲडव्हेंचर कर.” त्याचवेळी आणखी एका चाहत्याने लिहिले की, “सुखरूप परत ये, लग्न करायचे आहे.” डिसेंबरमध्ये होणार्‍या खऱ्या ॲडव्हेंचरचा अनुभव घेऊन आणखी एक चाहत्याने लिहिले की, “तू रॉक करशील.”

विकी काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विकी आणि कॅटरिना लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. विकीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘सॅम बहादुर’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ चित्रपट देतोय जबरदस्त टक्कर, पाहा दोन्ही चित्रपटांची कमाई

-कमल हसन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला रेकॉर्ड, चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद

-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

हे देखील वाचा