Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड ‘मी जिथे जायचो तिथे अभिमानाने सांगायचो…’, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्युत जामवालने दिला सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा

‘मी जिथे जायचो तिथे अभिमानाने सांगायचो…’, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्युत जामवालने दिला सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवार २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. सिद्धार्थच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो हे जग सोडून गेला आहे यावर अजूनही कोणाचाच विश्वास बसत नाही. केवळ चाहतेच नव्हे तर त्यांचे या इंडस्ट्रीमधील मित्रसुद्धा सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सिद्धार्थच्या जिवलग मित्रांपैकी एक विद्युत जामवालने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली.

सिद्धार्थ शुक्ला आणि विद्युत जामवाल हे एकमेकांचे चांगले मित्र होते. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे त्याचे मित्र खूप अस्वस्थ आहेत. हेच कारण आहे की, विद्युत जामवालने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जिवलग मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे. विद्युतने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा दिला. तो सिद्धार्थला मनापासून आठवत होता आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी, किस्से लोकांशी शेअर करत होता.

विद्युतने याच दरम्यान सांगितले की, “सिद्धार्थ कधीही माझ्या घरी येत असे. त्याला जे वाटले ते तो माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचा. तो माझा खूप चांगला मित्र होता. मी खूप भाग्यवान आहे की, तो माझा मित्र होता. मी सिद्धार्थचा खूप वापर केला आहे. मी जिथे ही जायचो तिथे मी अभिमानाने सांगत होतो की सिद्धार्थ माझा मित्र आहे.”

विद्युतने सिद्धार्थच्या आईसाठी एक संदेश ही यावेळी दिला. तो म्हणाला की, “मला फक्त आंटीला सांगायचे आहे की, जेव्हा मी सिद्धार्थसोबत होतो तेव्हा मला वाटले की, मी माझ्या आईवर जितके प्रेम करतो त्यापेक्षा तो त्याच्या आईवर जास्त प्रेम करत होता. तेव्हा मला त्याचा खूप हेवा वाटायचा. सिद्धार्थ शुक्लाच्या फॅन क्लबला सलाम की, तुम्हाला माहिती होते की तो कोण आहे.”

त्याचबरोबर विद्युत पुढे म्हणाला की, “मला सिद्धार्थ शुक्लाचा खूप अभिमान आहे. मी मनापासून म्हणू शकतो की, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो.” याच दरम्यान, विद्युत सिद्धार्थची आठवण करताना भावनिक देखील झाला. यासोबतच त्याने ‘फास्ट अँड फ्युरियस’ हे गाणेही सिद्धार्थला समर्पित केले. तो म्हणाला की, “सिद्धार्थ एक अतिशय चांगला माणूस होता, त्याच्यामध्ये नकारात्मक काहीही नव्हते. सिद्धार्थ कडून सर्वांचे आभार.”

सिद्धार्थ शुक्ला आणि विद्युत जामवाल सहसा एकत्र जिम करायचे. एवढेच नाही तर त्याने सांगितले की, “तो सिद्धार्थसोबतची पहिली भेट विसरू शकत नाही.” या दोघांची मैत्री जवळजवळ १७ वर्षांची आहे. २००४ मध्ये त्यांची पहिली भेट मुंबईत झाली. जिमबरोबर सुरू झालेली ही मैत्री जवळच्या मित्रापर्यंत पोहचली होती. दोघांची शेवटची भेट १५ जुलै रोजी झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा