Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड भांडं फुटलं रे! अनन्या की रश्मिका, कुणाला डेट करतोय विजय देवरकोंडा? करण जोहरने स्पष्टच सांगितलं

भांडं फुटलं रे! अनन्या की रश्मिका, कुणाला डेट करतोय विजय देवरकोंडा? करण जोहरने स्पष्टच सांगितलं

विजय देवरकोंडा साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये गणला जातो. विजय फक्त साऊथ इंडस्ट्रीपुरता मर्यादित राहिला नाहीये. त्याने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. त्याने ‘लायगर’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे होती. विजयची लोकप्रियता इतकी जास्त आहे की, दरदिवशी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले जाते. मात्र, अभिनेत्री रश्मिका मंदाना ही एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिच्यासोबत विजयचे नाव सर्वाधिक जोडले जाते. मात्र, करण जोहर याने त्याच्या ‘कॉफी विथ करण 7‘ शोमध्ये विजयच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे.

कोणाला डेट करतोय विजय देवरकोंडा?
अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या जवळच्या मित्रांनी कधीच त्याच्या डेटिंगच्या बातम्यांची पुष्टी केली नाही. रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्याव्यतिरिक्त अनन्या पांडे (Ananya Panday) ही अभिनेत्री कथितरीत्या विजयवर प्रेम करते. तसेच, अशा अफवा आहेत की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) या शोच्या फिनाले एपिसोडमध्ये करण जोहर (Karan Johar) याने विजयच्या नात्याबद्दल चर्चा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

अनन्या पांडे की रश्मिका मंदाना?
जेव्हा करणला विचारण्यात आले की, विजय रश्मिका किंवा अनन्या यांच्यापैकी कुणाला डेट करत आहे? त्यावेळी त्याने स्पष्ट सांगितले की, तो कोणालाच डेट करत नाही. तो सध्या सिंगल आहे. रश्मिका आणि अनन्या यांच्याव्यतिरिक्त सारा अली खान (Sara Ali Khan) हीदेखील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे नाव विजयसोबत करणच्या शोमध्ये आल्यानंतर त्याच्यासोबत जोडले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

सारा अली खानसोबत जोडले जात आहे नाव
‘कॉफी विथ करण 7’च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान ही तिची मैत्रीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्यासोबत आली होती. त्यावेळी शोच्या एका सेगमेंटमध्ये जेव्हा करणने साराशी एका अशा अभिनेत्याचे नाव विचारले, ज्याला तिला डेट करायला आवडेल. याचे उत्तर देताना अभिनेत्रीने विजय देवरकोंडा याचे नाव घेतले होते. त्यानंतर चाहते त्या दोघांनाही एकत्र पाहण्याची वाट पाहत आहेत. मात्र, दोघेही कथितरीत्या सिंगल आहेत आणि कोणालाही डेट करत नाहीयेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
राडाच! खरोखरची बंदूक चालवून ‘रॉकी भाई’ने दाखवला जलवा, व्हिडिओ पाहून चाहत्याला आठवली ‘केजीएफ’ची ‘कलाशनिकाव’
हॉटनेसचा तडका! शर्टची बटणं उघडी ठेवून अभिनेत्रीनं थेट विमानतळावर माजवली एकच खळबळ, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा