Friday, April 19, 2024

‘केसरिया’ गाण्यावरून अयान मुखर्जीवर भडकलेला करण जोहर, पण काय होते कारण?

अभिनेता रणबीर कपूरशाहरुख खानआलिया भट्टअमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने जगभरात धमाकेदार कमाई केली आहे. साेशल मीडियावर बाॅयकाॅटचा ट्रेंड चालू असतानाही त्याचा परिणाम चित्रपटावर पडला नाही. चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर दमदार कमाई करत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने भारतातच नाही, तर विदेशातही विक्रमी कमाई केली. 

एकीकडे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) जिथं चित्रपट रिलीज झाल्यानंतरही सतत प्रमाेशन करताना दिसले. दुसरीकडे, करण जोहर (Karan Johar) आणि अयान मुखर्जी (Ayan Mukerji) हे ‘ब्रह्मास्त्र’चे लोकप्रिय गाणं ‘केसरिया’यांच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील क्रिएटिव्ह फरकाबद्दल बोलले. करणने असेही सांगितले की, “अयानने घेतलेला शॉट त्याला आवडला नाही.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, अयान मुखर्जी फ्रेम्स फास्ट ट्रॅक इव्हेंटमध्ये (FICCI) म्हणाला, “अशा काही गोष्टी होत्या, ज्या करणला अजिबात आवडल्या नव्हत्या. मात्र, जेव्हा करणने हा सीक्वेन्स पाहिला, तेव्हा तो थोडासा स्टिरियोटाईप झाला.” एवढेच नाही, तर अयान मुखर्जीने यादरम्यान अपशब्द वापरले आणि नंतर सांगितले की, “मला आशा आहे की, मला हे बोलण्याचे स्वातंत्र्य असेल.”

अयान मुखर्जीची ही गाेष्ट ऐकल्यानंतर करण म्हणाला, “मी असे कधी ही बाेललाे नाही. मी फक्त असं बाेललाे की, सीन खूपच खराब आहे आणि तुम्ही याला री- शूट करायला पाहिजे. मात्र, आता आपण असे म्हणू शकतो की, केसरिया गाणे त्या वेळी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने शूट केले गेले होते. रणबीर जेव्हा केसरिया या गाण्यासाठी शूटिंग करत होता, तेव्हा त्याला थोडा ताप आला होता. हे गाणे पाहून मी अयानला विचारले, हे सर्व काय चालले आहे? काय करतोय अयान? तो का नाचत होता? केसरिया पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने शूट केले गेलं आहे.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

केसरिया गाण रिलीज झाल्यावर मेकर्स झाले ट्राेल
करण जाेहरच्या चित्रपटावर अनेकदा ट्यून चोरण्याचा आराेप लागताे. ज्यावेळी केसरिया गाणं रिलीज झालं, त्यावेळी या गाण्याच्या लिरिक्सला साेशल मीडियावर खूप ट्राेल करण्यात आलं. साेशल मीडियावर असेही काही ट्राेल्स हाेते, ज्यांनी ब्रह्मास्त्रच्या  केसरिया गाणं आणि 2007मध्ये आलेला चित्रपट ‘एक चालीस की लास्ट लोकल’ यातील ‘लारी छोटी’हे गाणं यात बऱ्याच गाेष्टीचे साम्य असल्याच सांगितलं. तरी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यावर चित्रीत केलेल हे गाणं 2022 मधील ‘वन ऑफ द बेस्ट राेमॅंटिक’ ट्रॅक मानले जात आहे. या गाण्याला युट्यूबवर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? 12 वर्षांच्या वयातच धरलेली अभिनयाची कास; तिचीच रंगलीय चर्चा
आता घाबरायचं कामच नाही! 23 चित्रपट निर्मात्यांचा नेपोटिझमवर हल्ला; नवीन कलाकारांसाठी बनवला प्लॅटफॉर्म

हे देखील वाचा