Saturday, June 29, 2024

‘लायगर’ने उठवला विजयचा बाजार! आगामी सिनेमा सुरू होण्यापूर्वीच पडला बंद; स्वखर्चातून करणार नुकसानभरपाई

साऊथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा होय. साऊथमध्ये धमाल केल्यानंतर विजय बॉलिवूड गाजवण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्याने ‘लायगर‘ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले. मात्र, त्याचा पहिलाच प्रयत्न चांगलाच फसला. प्रचंड प्रमोशन करूनही त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला. त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. यानंतर त्याला चारही बाजूंनी धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकीकडे त्याला खिशातून कोटी रुपये भरावे लागतायेत. दुसरीकडे अशी बातमी आहे की, त्याचा आगामी सिनेमा सुरू होण्यापूर्वीच बंद पडलाये.

हाती आलेल्या वृत्तानुसार, अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या ‘लायगर’ सिनेमाच्या अपयशाचा परिणाम त्याच्या ‘जन गण मन’ या आगामी सिनेमावर पडलाये. असे म्हटले जात आहे की, त्याचा हा सिनेमा बंद पडला आहे. सूत्रांनी माध्यमांकडे या बातमीची पुष्टी केली आहे. ‘लायगर’ आणि ‘जन गण मन’ या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे होते. 25 ऑगस्ट रोजी ‘लायगर’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच घोषणा करण्यात आली होती की, विजय आणि पुरी जगन्नाथ हे आणखी एका प्रोजेक्टवर काम करतील. त्या सिनेमाचे नाव ‘जन गण मन’ असे असेल. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होईल असेही सांगण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

निर्मात्यांचे मोठे नुकसान
ट्रेड सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लायगर’ या सिनेमाने भारतभरात पहिल्या आठवड्यात 35 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाचा आवाका पाहता हा खूपच निराशाजनक आकडा आहे. या सिनेमाचे बजेट तब्बल 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशात निर्मात्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.

आपल्या खिशातून पैसे देणार विजय
असेही म्हटले जात आहे की, विजय आता याची नुकसानभरपाई स्वत:च्या खिशातून करणार आहे. तो त्याच्या कमाईचा एक भाग निर्माते चार्मी कौर आणि इतर निर्मात्यांना देणार आहे. या नुकसानभरपाईची रक्कम 6 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अर्शदीपच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आयुषमान खुराना; म्हणाला,’देवासाठीतरी…’
धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लूकवर भडकले चाहते; म्हणाले ‘सर्जरीने चेहऱ्याची वाट लावली…’
अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘गुडबाय’चा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ, शूट करायला लागले तब्बल 25 तास

हे देखील वाचा