Monday, July 15, 2024

‘लायगर’मधील गाण्यावर विजयसोबत रोमान्स करताना दिसली अनन्या, खुद्द अभिनेत्रीनेच शेअर केला व्हिडिओ

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) याचा ‘लायगर‘ हा सिनेमा 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमातून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. या सिनेमाचे त्याने जोरदार प्रमोशन केले होते. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राडा करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. मात्र, प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा सिनेमा सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे आता सिनेमातील मुख्य अभिनेता विजय हा सिनेमाच्या खराब कामगिरीने खूपच निराश झालाये. परंतु त्यांच्या अभिनयाला चाहत्यांनी पूर्णपणे नाकारले.

अनन्या पांडे(Ananya Pandey) अजूनही त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये. तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ती सतत या चित्रपटाशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. पुन्हा एकदा अनन्याने एक पोस्ट शेअर केली आहे. अनन्या पांडेने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘लायगर’ चित्रपटातील एका गाण्याची क्लिप शेअर केली आहे. यात अनन्या पांडे विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसत आहे. या गाण्यात दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

हे गाणे शेअर करताना अनन्याने सांगितले की, हे तिचे आवडते गाणे आहे. अनन्या पांडेने लिहिले, ‘सोचा ना था…’ हे गाणे आपल्याला पुन्हा पुन्हा प्रेमात पाडू शकते. हे माझे आवडते गाणे आहे. अनन्याने ‘लायगर’ मधून साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. पण, या चित्रपटाची आणि खुद्द अनन्याची जादू प्रेक्षकांवर चालताना दिसत नाही.

मात्र, अनन्याच्या या नुकत्याच झालेल्या पोस्टला यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका यूजरने कमेंट करत ‘हे गाणं चित्रपटात का नाही?’ एका यूजरने म्हटले आहे की, ‘तुम्ही दोघे एकत्र खूप क्यूट दिसता. तुम्ही दोघे एकमेकांना डेट करू शकता का? आणखी एका यूजरने म्हटले आहे की, ‘तुम्ही आणि विजयने आता एकत्र रोमँटिक चित्रपट करावा. तुझी केमिस्ट्री अप्रतिम आहे. अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘या’ नावाने ओळखला जाणार अनिल कपूरांचा नातू; व्हिडिओद्वारे झाला खुलासा
सनी लिओनी रेमो डिसूजासोबत घेऊन येणार नवीन गाणे, पारंपारिक पोशाखात दिसणार अभिनेत्री
कॅटरिनाचा ग्लॅमरस लुक! फोटो होत आहेत व्हायरल…

हे देखील वाचा