सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मग ते त्यांच्या गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडविषयी असो, लग्नाविषयी असो किंवा आगामी सिनेमाविषयी असो. असेच काहीसे विजय देवरकोंडा याच्याबाबतही आहे. विजयच्याही घराबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चला तर जाणून घेऊया, त्याच्या आलिशान बंगल्याविषयी.
हैदराबादमध्ये राहतो विजय
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा हैदराबादमध्ये राहतो. काही काळापूर्वी त्याने एक आलिशान घर खरेदी केले होते. त्याच्या घराची किंमत काही कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते. माध्यमांतील वृत्तांनुसार, विजयच्या घराची किंमत ही तब्बल २० कोटी रुपये आहे. विजयने या आलिशान बंगल्यातील सुंदर फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते, जे भलतेच व्हायरल झाले होते. या फोटोंसोबतच विजयने एक झक्कास कॅप्शनही लिहिले होते.
View this post on Instagram
त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “इतके मोठे घर खरेदी करून मला खूप भीती वाटत आहे. मी माझ्या आईला सांगितलं आहे की, तिने हे चांगलं घर बनवावं.” विजयने जरी कोट्यवधी रुपयांचे आलिशान घर विकत घेतले असेल, परंतु तो साधं राहणीमान जगतो. त्यामुळेच तो मागील काही दिवसांपूर्वी ‘लायगर’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचला त्याने १९९ रुपयांची चप्पल परिधान केली होती. हे पाहून चाहत्यांनी त्याच्या साधेपणाचे जोरदार कौतुक केले होते.
View this post on Instagram
विजयच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर त्याचे नाव सध्या प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्यासोबत जोडले जात आहे. ‘कॉफी विथ करण ७’मध्येही विजयने रश्मिकाला स्पेशल म्हटले होते. तसेच, तो म्हणाला होता की, रश्मिका त्याची डार्लिंग आहे.
View this post on Instagram
विजयचे बॉलिवूड पदार्पण
विजय ‘लायगर’ (Liger) या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. हा सिनेमा या महिन्याच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे, हा त्याचा पहिला पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. त्याच्या या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मोठ्या मोठ्या बाता मारायचा पण तु सुद्धा…’ ब्रेकअपच्या चर्चेनंतर कियारा अडवाणीची पोस्ट व्हायरल
‘बदनाम व्हायला मी मुन्नी आहे का?’ उर्वशी रौतेला रिषभ पंतचा सोशल मीडियावर रंगला वाद
इकडं आख्खा देश साजरा करत होता रक्षाबंधन, तिकडं ऋतिकची एक्स पत्नी बॉयफ्रेंडसोबत करत राहिली पार्टी