Sunday, July 14, 2024

बॉलिवूडमध्ये धमाके करण्यास सज्ज झालेत ‘हे’ दाक्षिणात्य कलाकार, याचवर्षी मारणार एन्ट्री

बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवण्याचा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता हिंदी चित्रपटसृष्टीत आपला डंका वाजवण्यासाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारही सज्ज झाले आहेत. पूजा हेगडे (Pooja Hegde), काजल अग्रवाल (Kajal Agarrwal), रजनीकांत (RajiniKanth) यांच्यासह अनेक अनेक आहेत. ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी हिंदी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते आणि त्यांनी दक्षिणात्य प्रेक्षक वर्गाप्रमाणेच बॉलिवूड प्रेक्षकांचे देखील जोरदार मनोरंजन केले आहे. तर आता असे आणखी बरेच कलाकार आहेत जे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. चला तर मग या कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)
अभिनेता विजय देवरकोंडा यावर्षी ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे दिसणार आहे. या चित्रपटात विजय एका भयानक फायटरच्या भूमिकेत दिसणार आहे.

नागा चैतन्य (Naga Chaitanya)
अभिनेता नागा चैतन्य  हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. नागा लवकरच आमिर खान आणि करीना कपूरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १४ एप्रिलला बैसाखीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)
‘पुष्पा’ या तेलगू चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’चे शूटिंगही करत आहे.

नयनतारा (Nayanthara)
अभिनेत्री नयनतारा शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचे चाहते तिच्या पदार्पणबाबत खूपच उत्सुक आहेत.

प्रियामणी (Priyamani)


अभिनेत्री प्रियामणी अमेझॉन प्राईम व्हिडिओची प्रसिद्ध मालिका फॅमिली मॅन’मध्ये दिसली आहे. मात्र आता ‘मैदान’ या चित्रपटातून ही अभिनेत्री पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘मैदान’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तो फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा