Tuesday, July 9, 2024

‘मी विजयला अर्धनग्न पाहिलंय, आता मला पूर्ण…’, ‘या’ अभिनेत्रीचा थेट करण जोहरसमोरच मोठा खुलासा

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा हा ‘लायगर’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. यासोबतच त्याने करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोच्या ७व्या पर्वातही पदार्पण केले. या शोमध्ये तो सहकलाकार अनन्या पांडे हिच्यासोबत पोहोचला होता. यावेळी दोघांनाही करण जोहर याच्या प्रश्नांची उत्तरे देत वैयक्तिक आयुष्यातील गुपीत उघड केले. शोमध्ये रॅपिड- फायर राऊंडमध्ये करणने विजयला न्यूड फोटोशूटबद्दल प्रश्न विचारले. यावेळी त्याने ‘हो’ असे उत्तर दिले. विशेष म्हणजे, यावेळी अनन्याने असेदेखील म्हटले की, विजयला ‘पूर्णपणे नग्न’ पाहण्यात तिला कोणतीही अडचण होणार नाही.

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने कॉफी विथ करण (Koffee With Karan) शोमध्ये करण जोहर (Karan Johar) याच्यासोबत खूपच धमाल केली. यादरम्यान रॅपिड- फायर राऊंडमध्ये त्याला न्यूड होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच, त्याने असेही विचारले की, तो कंडोम ब्रँडच्या जाहिराती करण्यासाठी तयार होईल का? यावर विजयनेही बेधडक प्रतिक्रिया दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करण्यासाठी तयार
करणने रॅपिड- फायर राऊंडवेळी ‘डू और डाय’ सेगमेंटमध्ये विजयला विचारले की, तो आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करेल का? याचे उत्तर देताना विजय म्हणाला की, “जर तो चांगल्याप्रकारे शूट होत असेल, तर मला त्यामध्ये कोणतीही अडचण नाहीये.”

कंडोम ब्रँडची जाहिरात करेल का विजय?
न्यूड फोटोशूटवरील प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर करणने पुढील प्रश्न विचारला की, “तो कंडोम ब्रँडची जाहिरात करेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने याचे समर्थन करत ‘हो’ म्हटले. विजय म्हणाला की, “मला वाटते की, जर तुम्हाला १० मुले नको असतील, तर हे वास्तविकरीत्या स्मार्ट आणि सुरक्षित काम आहे. याला माझा पूर्ण पाठिंबा असेल.”

विजयला ‘पूर्णपणे न्यूड’ पाहण्यात अनन्याला नाही अडचण
दुसरीकडे अनन्याला ‘डू और डाय’ या सेगमेंटमदरम्यान विचारले गेले की, विजयला न्यूड पाहायचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, “मी थोडेफार ‘लायगर’मध्ये पाहिले आहे. त्याला कुणाला पाहावे वाटणार नाही.”

‘लायगर’ या सिनेमाबाबत बोलायचं झालं, तर हा सिनेमा येत्या २५ ऑगस्ट, २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अरेरे कसलं ते दुर्देव! ‘या’ सुपरहिट सिनेमांना लाथाडत संजू बाबाने केली मोठी चूक? ‘बाहुबली’चाही समावेश
भांडं फुटलं रे! विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत अनन्याचा मोठा खुलासा, म्हणाली…
‘लायगर’ सारखा चित्रपट करूनही अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा का फिरतायत लोकलने?

हे देखील वाचा