Tuesday, May 21, 2024

भांडं फुटलं रे! विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत अनन्याचा मोठा खुलासा, म्हणाली…

‘लायगर’ हा सिनेमा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ आणि ‘पूरी कनेक्ट्स’ या बॅनरखाली बनत आहे. या सिनेमातून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड पदार्पण करत आहे. विजयची गणना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेत्यांमध्ये होते. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची रांगच रांग लागलेली असते. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत असतो. यंदाही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत आला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिला डेट करत आहे. ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee With Karan 7) या प्रसिद्ध शोमध्ये ‘लायगर’ सिनेमातील कलाकार अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी हजेरी लावली होती. यावेळी शोच्या चौथ्या एपिसोडमध्ये अनन्याने विजय आणि रश्मिकाच्या रिलेशनशिपवर (Vijay Rashmika Relationship) शिक्कामोर्तब केले.

अनन्या पांडे हिने सांगितले की, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, तिने खुलेपणाने गोष्टी न सांगता फक्त अप्रत्यक्षपणे इशाऱ्यांमध्ये सांगितले. करण जोहर याने अनन्याला विचारले की, कोणकोणते कलाकार डेट करत आहेत. यावर तिने विजयचे नाव घेत सांगितले की, “तो सध्या मिका सिंगच्या मार्गावर चालत आहे.” यावर विजयही हैराण झाला आणि फक्त हसत हसत म्हणाला की, “तू खरंच असा विचार करते?”

रश्मिका आणि विजय हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. अफेअरच्या चर्चांमध्येच या दोघांना एकमेकांसोबत स्पॉटही करण्यात आले आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप हिरवा कंदील दाखवला नाहीये. तसेच, त्यांनी एकमेकांना चांगले मित्र असेच सांगितले आहे.

दोघांचेही सिनेमे
रश्मिका आणि विजय या दोघांनीही एकत्र ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे. हे सिनेमे जेव्हा प्रदर्शित झाले होते, तेव्हापासूनच या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘लायगर’ सारखा चित्रपट करूनही अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा का फिरतायत लोकलने?
रात्रीच्या वेळी उर्फी जावेदने केले ‘असे’ काही की, बघणारेही होतील हैराण
संजय दत्तला स्वत:ची मुलगीच म्हणू लागली होती ‘काका’, ‘या’ गोष्टीमुळे चिंतेत पडला होता अभिनेता

हे देखील वाचा