कलाकार नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. त्यांच्या कामासोबतच ते इतर अनेक बाबींमुळे लाइमलाईट्मधे येतात. सध्या हॉलीवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता असलेला विल स्मिथ सध्या त्याच्या बायोग्राफी खूपच चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या या पुस्तकात अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे केले असून, जे सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये तुफान गाजत आहे. विल स्मिथने या पुस्तकात त्याच्या अतिशय खासगी अशा सेक्स लाईफबद्दल काही धक्कादायक आणि आश्चर्यकारक खुलासे केले आहेत.
‘मॅन इन ब्लॅक’, ‘अली’, ‘इंडिपेडन्स डे’ आदी सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या विलने या पुस्तकात सांगितले की, जेव्हा त्याचे त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले तेव्हा त्याने अंक महिलांसोबत संबंध ठेवले आणि तो आजारी पडला. विल स्मिथने त्याची बायोग्राफी ‘विल’ याच महिन्याच्या सुरूवातीला प्रदर्शित केली. या बायोग्राफीमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक अनुभव सांगितले आहेत.
यातलाच एक त्याच्या गर्लफ़्रेंडशी संबंधित किस्सा त्याने सांगितला आहे. जेव्हा विल १६ वर्षांचा होता तेव्हा त्याची Melanie नावाची गर्लफ्रेंड होती. जिच्यावर तो मनापासून प्रेम करत होता. मात्र काही कारणास्तव त्यांचे नाते तुटले, आणि त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणात आणि वेगाने शारीरिक संबंध ठेवण्यास सुरूवात केली. एका माहितीच्या अनुसार या बायोग्राफीमध्ये विल स्मिथने लिहिले आहे की, “मला शांती पाहिजे होती. या शांततेची मला खूपच गरज होती, कारण माझे हृदय तुटले होते. या दुःखातून बाहेर येण्यासाठी मी होमीयोपॅथिक काही तोडग्यांचा आधार घेतला आणि मोठ्या प्रमाणावर सेक्शुअल इंटरकोर्स सुरू केले.
विल स्मिथने पुढे सांगितले आहे की, “Melanie सोडून त्यांचे फक्त एका महिलेशी संबंध होते. मात्र त्यांच्या गर्लफ्रेंडने त्याला धोका दिला. जेव्हा विल एका म्युझिक टूरसाठी दोन आठवडे बाहेर होता तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला चिट केले. त्यानंतर स्मिथने इतक्या महिलांसोबत शाहरुख संबंध ठेवले की, तो आजरीच पडला. मी ब्रेकअप करू शकत नव्हतो. मी अनेक महिलांसोबत संबंध ठेवल्याने मला psychosomatic रिअक्शन झाली. यात मला उलट्या देखील होत होत्या. एवढे करूनही आला मनाजोडी जोडीदार मिळत नव्हती.”
आता विल विवाहित असून त्यानं १९९२ साली अभिनेत्री Sheree Zampino सोबत लग्न केले असून त्यांना एक मुलगा आहे. मात्र १९९५ साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९९७ साली त्याने Jada Koren Pinkett दुसरे लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय
-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित