Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्यांना गाताना पाहिले की तुम्हीही म्हणालं, झालं तेवढं पुरे झालं आता बास!

‘या’ अभिनेत्यांना गाताना पाहिले की तुम्हीही म्हणालं, झालं तेवढं पुरे झालं आता बास!

बॉलिवूडच्या स्टार्सना आपण मोठ्या पडद्यावर बघून टाळ्या वाजवताना थकत नाही. त्यांच्या लुक्स आणि स्टाइलपासून ते त्यांच्या बोलण्याच्या शैलीपर्यंत, आपल्याला ते इतकेे आवडतात की आपणसुद्धा त्यांची नक्कल करायला लागतो. बॉलिवूडमधील अनेक स्टार्स बहु-प्रतिभावान आहेत. ते जितका चांगला अभिनय करतात तितकेच चांगले गायक देखील आहते. परंतु असेही काही लोक आहेत ज्यांचे गाणे ऐकणे आपल्याला एकतर खरा सूर विसरायला लावते किंवा यामुळे आपल्या कानात वेदना होतात.

अशा स्टार्समध्ये पहिले नाव आहे खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार याचेे. तुम्ही उत्सुकतेने त्याच्या चित्रपटाची वाट पाहता पण तुम्ही त्याचे गाणे कधी ऐकले आहे का? अक्षय जितका चांगला अभिनय करतो तितकेच वाईट तो गाणे गातो.

https://www.youtube.com/watch?v=sSJkCnzKP2I

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हानेही गाणे गाऊन चाहत्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचा हा डाव असा उलटा झाला की चाहते रडू लागले. जर तुम्ही सोनाक्षीचे मोठे चाहते असाल तर तिने गायलेले गाणे नक्कीच ऐका.

https://www.youtube.com/watch?v=CdHj7zVzTqs

कदाचित सलमान खानची अशी एखादीच बाब असेल जी त्याच्या चाहत्यांना आवडत नसेल. पण गाण्याच्या बाबतीत ही गोष्ट उलट आहे. गायन क्षेत्रात भाईजानचे क्वचितच फॅन असतील.

प्रियंका चोप्रा एका छोट्या गावातून बॉलिवूडमध्ये गेली आणि पुढे तिने हॉलिवूडमध्येही धमाल केली. पण गाण्याच्या क्षेत्रात चाहत्यांना तिचे गाणे तिच्या अभिनयाइतके आवडले नाही.

https://www.youtube.com/watch?v=kn1fqzNgojE

याशिवाय लॉकडाऊन दरम्यान किंग खाननेदेखीले त्याच्या गायन कलेबद्दल प्रयोग करून पाहिला. मात्र, हे गाणे चाहत्यांना त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त आवडले नाही.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा