Monday, June 22, 2026
Home बॉलीवूड शाहिद कपूरचा कॉकटेल 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकुळ, लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा

शाहिद कपूरचा कॉकटेल 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकुळ, लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा

शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘कॉकटेल 2’ हा रोमँटिक ड्रामा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रीलीज पुर्वीपासुन खुप चर्चेत राहीला आहे. तर रीलीज नंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळूनही, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असून त्याची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. 19 जुन रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच  या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई पाहता, तिसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी म्हणजे, हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांचा आणि जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, ‘कॉकटेल 2′ ने तिसऱ्या दिवशी 17.75 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण निव्वळ कमाई 47.50 कोटी रुपये आणि एकूण ग्रॉस कलेक्शन 57 कोटी रुपये झाले आहे. भारताबाहेरही हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत असून, त्याचे जागतिक ग्रॉस कलेक्शन आता 76.26 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आता सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या सोमवारच्या कमाईकडे लागले आहे.

.’कॉकटेल 2’ हा 2012 मधील ‘कॉकटेल’ या चित्रपटाचा सिक्वेल’ आहे.  चित्रपटात शाहिद (shahid)कपूर, रश्मिका मंदान्ना आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. लंडन आणि केप टाउनच्या सुंदर ठिकाणी चित्रित झालेला हा चित्रपट एका रोमँटिक ‘लव्ह ट्रँगल’वर आधारित आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट उत्तम पंसतीस उतरत आहे. कारण यातील कथा आणि गाणी युवा पिढीला काहीशी रिलेटेबल कहाणी आहे.

“तो मला थोबाडीत मारणार होता” – ट्विंकल खन्नाने आमिर खानवर केला हा आरोप

हे देखील वाचा